अत्याधुनिक सुविधायु्नत राजमाता जिजाऊ बस सेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाेकार्पण

    26-Mar-2026
Total Views |
 

CM 
 
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज राजमाता जिजाऊ बस सेवेचे लाेकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. विधान भवन प्रांगणात पार पडलेल्या या साेहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. माधव कुसेकर, अशाेक लेलँडचे वरिष्ठ व्यवस्थापक जाॅन मॅथ्यू, टाटा माेटर्सचे ग्लाेबल हेड सुशांत नाईक आदी उपस्थित हाेते.मुख्यमंत्री फडणवीस; तसेच उपमुख्यमंत्री शिंदे, पवार यांनी बसचे पूजन करून आणि फीत कापून या सेवेचा शुभारंभ केला. या बस सेवेचे लाेकार्पण झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बसमधून प्रवास करत बस सेवेची सुरुवात केली.