दिव्यांग बालकांना सामान्य बालकांप्रमाणेच जीवन जगता यावे आणि समाजात त्यांच्याबाबत सकारात्मक दृष्टिकाेन निर्माण व्हावा, यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. दिव्यांग बालकांसाठी ‘अंगणवाडी प्राेटाेकाॅल’ हा 0 ते 6 वयाेगटातील बालकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रारंभिक शिक्षणातून विकसित भारताची पायाभरणी या विषयावर पूर्व प्राथमिक शिक्षण राज्यस्तरीय परिसंवादात तटकरे बाेलत हाेत्या. दिव्यांग बालकांसाठी अंगणवाडी प्राेटाेकाॅलचे प्रकाशनही तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य सचिव राजेश अग्रवाल, आयु्नत माधवी सरदेशमुख, उपायु्नत विजय क्षीरसागर, सहआयु्नत संगीता लाेंढे, राॅकेट लर्निंगचे सह-संस्थापक सिद्धांत सचदेवा आदी यावेळी उपस्थित हाेते. या कार्यक्रमात राॅकेट लर्निंगच्या ई-आकार कुशल अंगणवाडी उपक्रमांतर्गत काेकण, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर व नागपूर विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.