एआयच्या वापरामुळे कामाचा वेग तर वाढला, पण विश्रांती गमावली

    26-Mar-2026
Total Views |
 
 


AI
 
 
आजच्या काळात एआयमुळे कामाचा वेग प्रचंड वाढला आहे. एका साॅफ्टवेअर डेव्हलपरने अनुभवले की, ज्या तंत्रज्ञानाने त्याचे ओझे कमी करायला हवे हाेते, त्याच तंत्रज्ञानाने त्याच्या कामातील विश्रांतीचे (ब्रेक्स) क्षण हळूहळू हिरावून घेतले आहेत.कर्मचारी आता फाईल लाेड हाेण्याची वाट बघताना, मीटिंगमधील माेकळ्या वेळेत किंवा जेवणाआधीच्या वेळेतही एआयच्या मदतीने काम करत राहतात. अमित खन्ना (ग्रँट थाॅर्नटन भारत) यांच्या मते, ‘कार्यक्षमता वाढली की आपली भूकही वाढते. मॅनेजरसाठी हा एक माेठा दबाव निर्माण करणारा मुद्दा ठरत आहे.’ सुरुवातीला हे अतिरिक्त काम वाटत नाही, मात्र दीर्घकाळ बसून राहिल्याने आराेग्यावर हाेणारे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत. संशाेधक याला ‘वर्कलाेड क्रीप’ असे म्हणतात.
 
याचा अर्थ असा की, जेव्हा उत्पादकता वाढते, तेव्हा श्रमात घट हाेण्याऐवजी कामाची उद्दिष्टे अधिक कठीण हाेतात आणि मानसिक ताण वाढताे. काही कंपन्या आता जाणीवपूर्वक मॅनेजर चेक-इन्स (प्रायाेरिटी रिसेट) आणि कामाचे प्राधान्य ठरवण्यावर भर देत आहेत.जेणेकरून वाढलेल्या वेगामुळे कर्मचाऱ्यांचे शाेषण हाेणार नाही.तज्ज्ञांच्या मते, एआयचा अवलंब करण्याच्या पद्धतीत ण-आकाराचा वक्र दिसून येत आहे, जिथे वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ कर्मचारी याचा सर्वाधिक वापर करत आहेत. कंपन्यांमध्ये आता उत्पादकता 20-30 टक्क्यांनी वाढली आहे, मात्र ही सुधारणा एकूण कामाचा वेळ कमी करण्याऐवजी वेगाने काम संपवण्यावर केंद्रित आहे. यामुळे कर्मचाऱ्यांकडून अपेक्षाही वाढल्याने कामाचा ताण अधिकच वाढला.