तेरे मन में शिवा, मेरे मन मे शिवा, सांसाे में शिवा...वाऱ्यावरती गंध पसरला, नाते मनाचे.. तू हे आसमा, मे तेरी ये जमी है...दिल चाहता है... लाडाची गं प्रेमाची गं अशी गाजलेली मराठी आणि हिंदी गीते सादर करून गायक कुणाल गांजावाला यांनी सुरेल गीतांची पर्वणी पुणेकरांना दिली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाने आयाेजिलेल्या संगीत महाेत्सवात कुणाल गांजावाला लाइव्ह इन काॅन्सर्टमध्ये कलाकारांनी सादरीकरण केले. यापूर्वी खंडेराव मुळे आणि सहकाऱ्यांचा स्वरयात्रा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘दिवस तुझे हे फुलायचे’ या जुन्या गीताला नवीन अंदाजात सादर करून गांजावालांनी पुणेकरांची मने जिंकली... त्यानंतर सादर झालेल्या ‘तुझं माझ्याशी नातं हे असं कसं आहे,’ या गाण्याच्या सादरीकरणावेळी रसिकांचे डाेळे पाणावले. ‘तेरा जिस्म ओढ लू’...‘सुनाे ना, संगमरमर की ये मीनारें’ या गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.