कॅनडातील ग्लाेबल 8000 : जगातील सर्वांत वेगवान बिझनेस जेट

    24-Mar-2026
Total Views |
 
 

plane 
कॅनडाची बिझनेस जेट कंपनी बाॅम्बार्डियरने काही दिवसांपूर्वी आपले पहिले ग्लाेबल 8000 जेट डिलिव्हर केले. मिळालेल्या माहिती नुसार कॅनडाचा माजी हाॅकी स्टार आणि आता उद्याेगपती असलेल्या पॅट्रिक डाेविगीने हे विमान सुमारे 708 काेटी रुपयांच्या बेस प्राइजवर खरेदी केले. कस्टमायझेशन नंतर याची एकूण किंमत 900 काेटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे जगातील सर्वांत वेगवान बिझनेस जेट आणि काॅनकाॅर्ड नंतर सर्वांत वेगवान नागरिक विमान आहे. त्याची रेंज 14,816 किमी आणि गती 1,173 किमी/तास आहे.