नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 500 चितळ साेडणार

    24-Mar-2026
Total Views |
 
 

navegaon 
 
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार झाल्यानंतर आता उपाययाेजनांच्या माध्यमातून वैश्विक स्तरावर व्याघ्र प्रकल्पाची ओळख प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. व्याघ्र प्रकल्पाचा विकास आणि व्याघ्र संवर्धन लक्षात घेत नवेगाव नागझिरा प्रकल्पात 500 चितळ साेडण्याची याेजना आखण्यात आली आहे.नवेगाव नागझिरात सध्या 17 ते 19 वाघ आहेत. वाघांचे संवर्धन करताना त्याची अन्न साखळी कायम राहणे गरजेचे आहे. प्रकल्पातील गवताचे मैदान कमी झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्या चितळांची संख्या कमी झाली आहे. हे लक्षात घेता ताडाेबा व पेंच व्याघ्र प्रकल्पातून 500 चितळ नवेगाव नागझिरात साेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्या दृष्टीने कारवाई सुरू झाली आहे.हे करताना जंगलातील गवताचे प्रमाण वाढवण्यासाठीही उपाययाेजना सुरू करण्यात आल्या आहेत.व्याघ्र प्रकल्पाची व्याप्ती वाढल्याने चार नवीन गेट तयार करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यातील कडेगाव हे प्रमुख गेट असणार असून, गाेंदिया जिल्ह्यातील पांगडी व जांभळी हे दाेन गेट राहणार आहेत. कॅमेरा ट्रॅप, नियमित आणि अन्य माध्यमांतून व्याघ्र प्रकल्पात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.