राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रभावी नेतृत्वाची दखल घेत प्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘साेसायटी अचिव्हर्स’ने मुंडेंच्या विशेष मुलाखतीसह त्यांना कव्हर पेजवर स्थान दिले आहे. देअर इज नाे सबस्टिट्यूट फाॅर इथिकल लीडरशिप या शब्दांत त्यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासाचा गाैरव करण्यात आला आहे.मॅगझिनची स्पेशल एडिशन यंदा प्रकाशित झाली असून, देश विदेशातील माेठ्या वाचकवर्गात ती पाेहाेचली आहे. अभ्यासू, धडाडीच्या आणि लाेकाभिमुख निर्णय घेणाऱ्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन या विभागांत मंत्री म्हणून काम करताना त्यांनी घेतलेल्या पुढाकारांचा आढावा या मुलाखतीत घेण्यात आला आहे. मॅगझिनच्या संपादिका अँड्रिया काेस्टबीर यांनी ही विशेष मुलाखत घेतली आहे.विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतीही या अंकात समाविष्ट आहेत.अँड्रिया काेस्टबीर आणि अशाेक धामणकर यांनी रामटेक निवासस्थानी भेट देऊन मुंडे यांच्या हस्ते या स्पेशल एडिशनचे प्रकाशन केले.