काेकण मंडळाची एप्रिलअखेरीस साेडत

    24-Mar-2026
Total Views |
 

hMhada 
 
म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2500 घरांच्या साेडतीची जाहिरात काढण्यासाठीच्या कामाला वेग दिला असतानाच आता काेकण मंडळही साेडतीच्या तयारीला लागले आहे. काेकण मंडळाने 2000 घरांची साेडत काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.घरांची शाेधाशाेध आणि घरांच्या किमती निश्चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. ते पूर्ण करून एप्रिलअखेरीस 2000 घरांच्या साेडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे काेकण मंडळाचे नियाेजन आहे.अर्जविक्री, स्वीकृती प्रक्रिया पूर्ण करून मे अखेरीस वा जूनच्या पहिल्या आठवड्यात साेडतीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.काेकण मंडळाने 2025 मध्ये 5285 घरांसह 77 भूखंडांसाठी साेडत काढली हाेती. या साेडतीसाठी दीड लाखांहूअधिक अर्ज सादर झाले हाेते.
 
मात्र, 700 हून अधिक घरांना शून्य प्रतिसाद मिळाल्याने यावेळी केवळ 4532 घरांसाठीच प्रत्यक्षात साेडत काढण्यात आली.साेडतीनंतर 4532 विजेत्यांपैकी 1300 हून अधिक विजेत्यांनी घरांना विविध कारणांनी नापसंती दर्शवली आणि घरे परत (सरेंडर) केली. या साेडतीतील उर्वरित विजेत्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, आता काेकण मंडळाने 2026 च्या साेडतीची तयारी सुरू केली आहे.यावर्षी अंदाजे 2000 घरांची साेडत काढता येणार आहे. त्यानुसार घरांची शाेधाशाेध सुरू असून, लवकरच घरे निश्चित करण्यात येतील. त्यानंतर घरांच्या किमती निश्चित करून साेडतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.
साधारणतः एप्रिलअखेरपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियाेजन असल्याची माहिती काेकण मंडळाचे मुख्य अधिकारी डाॅ. विशाल राठाेड यांनी दिली.