भारतीयांसाठी साेने, चांदी हे धातू फक्त शृंगाराचे साधन नाहीत; तर ते प्रत्येकाच्या आयुष्यातील माैल्यवान खजिना आहे. संकटाच्या वेळी विश्वासाने साथ देणारी आर्थिक ढाल आहे. विशेषतः भारतीय महिलांसाठी ते स्वप्न, सुरक्षितता, आदराचे प्रतीक आहे. कठीण काळातले साथीदार, पुढच्या पिढीला दिले जाणारे प्रेम आहे. गेल्या वर्षी राहुल रस्ताेगी यांना अचानक माेठ्या रकमेची गरज पडली. तेव्हा त्यांच्या पत्नीने दागिन्यांवर लाेन घेऊन कुटुंबाची आर्थिक स्थिती सांभाळली, अशी अनेक उदाहरणे आहेत.भारतीय घरांतील साेने हे देशाचे कवच वर्ल्ड गाेल्ड काउंसिल आणि माॅर्गन स्टॅनलीच्या रिपाेर्टमध्ये नमूद केले आहे की, भारतीय घरांमध्ये सुमारे 34,600 टन साेने आहे. ज्याची वर्तमानातील किंमत सुमारे 3,800 अब्ज ते 50,000 अब्ज असू शकते. हे जगातील इतर काेणत्याही देशातील व्यक्तिगत सुवर्ण भांडारापेक्षा कितीतरी अधिक आहे.