फक्त महानगरांमध्येच नव्हे तर छाेट्या-छाेट्या शहरांमध्येही उघडलेल्या जिममुळे लाेकांच्या व्यायामाबद्दलच्या समजुती बदलत आहेत, विशेषतः तरुण पिढीच्या. तरुण मुलं-मुली आता असं मानू लागली आहेत की जिममध्ये जाऊन महागड्या उपकरणांवर व्यायाम केल्यानेच फिट राहता येते किंवा वजन कमी करता येतं. पण तज्ज्ञ सांगतात की या गाेष्टीत अजिबात तथ्य नाही. तुम्ही अगदी कमी खर्चातही वजन कमी करू शकता आणि शरीराचे स्नायू मजबूत करू शकता. हाे, तुम्ही दाेरीच्या उड्या मारूनही स्लिम-फिट राहू शकता.तज्ज्ञ सांगतात की एक तास दाेरीच्या उद्या मारल्यास सुमारे 1000 कॅलरी जळतात. मात्र, सुरुवातीलाच सतत एक तास उड्या मारण्याची चूक करू नका.
सुरुवातीला थाेड्या वेळेसाठी उड्या मारा, नंतर थाेडी विश्रांती घ्या. त्यानंतर पुन्हा सुरु करा. अशा प्रकारे हळू-हळू वेळ वाढवत जा.
त्याचप्रमाणे एकाच प्रकारे उड्या मारू नका; दर 30 ते 40 सेकंदांनी स्टाईल बदलत रहा. त्यामुळे लवकर थकवा येणार नाही.दाेरीच्या उड्या मारल्यामुळे खांदे, बाहू आणि पायांना पुरेसा व्यायाम मिळताे, त्यामुळे त्यांचे स्नायू मजबूत हाेतात. याशिवाय, ते तुमच्या हात आणि पायांचा समन्वय राखण्यास मदत करते. त्यामुळे तुमची शरीरस्थिती (पाेश्चर)चांगली राहते आणि शरीर लवचिक बनते. दाेरीच्या उड्या मारल्यामुळे हाडेही मजबूत हाेतात. हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे, जाे चरबी कमी करण्यात प्रभावी ठरताे. दाेरीच्या उड्या मारल्यामुळे तुमची वेदना सहन करण्याची क्षमता वाढते आणि तुम्ही प्रत्येक गाेष्टीत अधिक सावध बनता.
कार्पेट, गवत, काँक्रीट किंवा असमतल पृष्ठभागावर दाेरीच्या उद्या मारणे टाळावे. अशा पृष्ठभागावर उड्या मारताना घसरून पडण्याचा किंवा घाेटा मुरगळण्याचा धाेका असताे.लाकडी फ्लाेअर किंवा इम्पॅक्ट एक्सरसाइज मॅट हा सर्वाेत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला गुडघा किंवा घाेट्यात काेणत्याही प्रकारची समस्या असेल, तर दाेरीच्या उड्या मारण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या डाॅक्टरांचा सल्ला घेणे विसरू नका.दाेरी उड्या मारण्याच्या व्यायामाची (र्गीाळिपस ठेशि) मूळ संकल्पना काय आहे? तुम्ही दाेरी डाेक्यावरून फिरवता आणि ती पायांखालील बाजूने जात असताना उडी मारता; ही प्रक्रिया तुम्ही जाेपर्यंत करू शकता (किंवा तुम्हाला करायची आहे) ताेपर्यंत पुन्हा पुन्हा करत राहता. यामध्ये सातत्यपूर्ण लय साधणे हे मुख्य उद्दिष्ट असते.