कसबा पेठेतील महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंचातर्फे जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने महावितरण ग्राहक तक्रार निवारण मंचाने उपस्थित नागरिकांना ग्राहकांच्या हक्कांची माहिती दिली. ग्राहक तक्रार निवारण व मंचाच्या कामकाजाबद्दल मंचाचे अध्यक्ष महेंद्र दिवाकर, स्वतंत्र सदस्य अरुण वाघमारे व सदस्य सचिव अपर्णा मुनशेट्टीवार यांनी मार्गदर्शन केले.तसेच, ग्राहकांना वीज सेवेबद्दल वारंवार पडणाऱ्या प्रश्नांची उदाहरणासहित असलेल्या छापील पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्राहक, ग्राहक प्रतिनिधी, ग्राहक पंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी आदी उपस्थित हाेते.