महालक्ष्मी सरस प्रदर्शन केवळ विक्रीचे ठिकाण नसून, महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य करत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांत उमेद माॅल उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या प्रदर्शनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, महालक्ष्मी सरस हा प्रदर्शनाचा ब्रँड अधिक मजबूत हाेत आहे. राज्यात शंभर काेटींचा व्यवहार बचत गटांच्या माध्यमातून हाेत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.याप्रसंगी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गाेरे, अर्थ व नियाेजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री कृपाल तुमाने,कृष्णा खाेपडे, चरणसिंग ठाकूर आदी उपस्थित हाेते. महालक्ष्मी सरसमध्ये सुमारे 404 स्टाॅल्स उभारण्यात आले असून, आतापर्यंत 10 काेटींची विक्री झाली आहे.यावेळी नागपूर जिल्हा परिषदेच्या दीदी की रसाेई उपाहारगृह, प्राेजेक्ट ड्रीम 100 व्हिलेज लायब्ररी, 14 आयसीटी लॅब, एआय लॅब ऑन व्हील - ज्ञानरथ, सुपर 40 अंगणवाडी, गुरुकुल एआय लॅब, अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांचे मुख्मंत्र्यांनी काैतुक केले.