आपण आपल्या मुलांना घाबरवत आहात का?

    24-Mar-2026
Total Views |
 

child 
 
या आधुनिक लाखाे माता आहेत काॅन्व्हेंट शिक्षित महिला. ज्या आपल्या मुलांचे पालनपाेषण फॅशनेबल मासिंकांमध्ये छापलेल्या सल्ल्याइशाऱ्यांच्या आधारे करतात. त्यांच्या बेडरूम व किचनमध्ये मुलांच्या माहितीसाठी आईने बनवलेले टाइम टेबलच टांगलेले नसते तर केव्हा काय किती खाऊ घालावयाचे, हा जेवणाचा तक्ताही टांगलेला असताे. मुलांना औषधे व टाॅनिक पाजणेही तेवढेच गरजेचे झाले आहे जेवढे दूध व चपाती देणे. जरी त्यांना गरज नसली तरी.अशा माता आधुनिकतेच्या स्पर्धेत दूधपित्या मुलाशीही इंग्रजीत बाेलतात जणू की मूल आईच्या गर्भातूनच इंग्रजी बाेलणे शिकून आले आहे.मुलाला सतत उपाशी समजण्याच्या व आपल्या लाडप्रेमात त्याला खाऊ घालत राहण्याचा अत्याचार करणाऱ्या मातांची संख्याही वाढत जात आहे. मुलाची तब्बेत बिघडते आहे, त्याचे वजन वाढत नाही इ. गाेष्टींची भीती मातांचे स्वत:चे संतुलन तर बिघडवत आहेच शिवाय मुलांनाही असह्य दु:ख देत आहे.
 
मातांच्या मनातील ही खाेटी भीती कधी कधी तर एवढी वाढते की त्या घाबरून त्यावर डाॅ्नटरी उपचार सुरु करतात व राेग नसतानाही औषधे खाल्ल्यामुळे त्याचे आराेग्य खराेखरच बिघडते.काही मातात तर मुलांना जबरदस्तीने खाऊ घालतात आणि ती खात नसल्यास त्यांना घाबरवतात, धमकावतात व मारतातही. परिणामी मूल उलटी करते व ते खाण्याच्या नावानेच चिडू लागतात. एवढेच नव्हे तर जेवणाचे ताट घेऊन येणाऱ्या आईच्या चेहऱ्याचाच धसका घेतात व तिच्यापासून दूर पळतात.आज ज्या समाजात मूल जन्म घेत आहे ते मूहचे भारतीय आहे. काही परकीय वस्तू व राहणीमानाच्या पकीय पद्धतींमुळे ताे काेणत्याही इंग्रजी संस्कृतीचा माणूस तर हाेत नाही. तरीही बऱ्याच आधुनिक माता त्याला कॅनडा-अमेरिकेच्य राहणीमानात व विचारात टाकू इच्छितात. तिला वाटते की प्रगतीचा खरा मार्ग हाच आहे.
 
जाहीर आहे की, माेठे झाल्यानंतर अशा मुलांचे तत्त्वशास्त्रच नव्हे तर लक्ष्यही चुकीचे हाेते आणि जीवनमूलयांची अशी खिचडी शिजवते की त्याला अर्धी शक्ती त्यांना नव्याने समजण्यात व त्यानुसार स्वत:ला पुन्हा बनवण्यात लावावी लागते. मुलांना या अत्यंत अवास्तव अनैतिक ढाचात बसवण्यासाठी निर्माण हाेणाऱ्या निराशेला पूर्ण जबाबदार त्या आधुनिक मातांवर आहे.ज्यांचे एकमेव लक्ष्य असते त्यांना अधिकाधिक पैसा कमावणारे बनवणे. त्या हे विसरतात की मुले चुकीची उदाहरणे घेऊन पुढे गेली तर तेही तसेच बनतील व त्यांच्यासमाेर अउचणींचा एक डाेंगर उभा राहील.आपल्याच मुलाची मूळ प्रकृती व स्वभाव समजण्यात चूक करणाऱ्या या माता मुलाची भावनिक न्यूनता आणि सांसारिक अपयशासाठीही पूर्णपणे जबाबदार आहे.लक्षात ठेवावे की मुले शारीरिक त्रास तर विसरून जातात पण त्यांचे मन व इच्छेसाेबत खेळणाऱ्या आईच्या शिस्तीच्या कारवाया ती दबके, भित्रे व कमकुवत बनवतात. त्यांचा स्वाभिमान दुखावतात. मनाेबल व आत्मविश्वास कमी करतात. ते हट्टी हाेतात आणि आइला घाबरू लगतात. घाबरतच आईला बाेलावतात व डाेळ्यांनी विनवरतात की, हा अत्याचार आणखी नकाे. पण आई हे इशारे समजत नाही त्याला काय म्हणावे.