प्रशंसा करून पाहा, जीवनाचा अंदाजच बदलेल

    23-Mar-2026
Total Views |
 

love 
इंग्रजीचा एक विद्वान म्हणताे की, ‘ यशस्वी दांपत्य जीवनासमाेर जगातील माेठ्याहून माेठे सुखही तुच्छ आहे. हे कथन सार्थ करण्यासाठी आपण दांपत्यजीवनाच्या आरंभापासूनच वा जेव्हा चेतना जागेल या नात्यात तडजाेडीचा असा पाया रचावा की ज्यावर उभा आपला संसारमहाल सुख, संताेष व आनंदाचे प्रतीक हाेऊन जाईल. त्यासाठी आपल्याला संधी व तडजाेडीच्या व्याकरणाचे काही नियम माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.दाेष नव्हे दिलासा द्या काेणत्याही चुकीसाठी आपल्या जाेडीदाराला दाेषी न ठरवता त्याऐवजी जर दिलासा देण्याचा प्रयत्न करीत ‘पाहू बरं, अमूक काम व्यवस्थित कसे हाेऊशकते.’ म्हटले तर त्याच्या मनात स्वत:च्या चुकीची जाणीव हाेण्यासाेबत आपल्याबद्दल एक आदर व श्रद्धेची भावना आपाेआपच दिसून येईल.
 
काही लाेकांची अशी प्रवृत्ती असते की, ते नेहमी मन दुखावणाऱ्या नकारात्मक गाेष्टी म्हणजेच ‘ हे काम तुला जमणारे नाही.’ वा ‘ तू आजपर्यंत एवढी चांगली भाजी बनवली आहे का?’ बाेलतील.पण याऐवजी गाेष्टीला सकारात्मक बनवले तर कितती फरक पडेल-‘तुझ्यात क्षमता आहे प्रयत्न करून पहा, कदाचित काम हाेऊन जाईल’ वा ‘अशी भाजी तूही बनवू शकतेस,’ ऐकून आपल्या जीवनसाथीचे मन आनंदाने भरून जाईल आणि ताे दुप्पट जाेमाने काम सुरू करील.अपमानित करू नका बाहेरच्यांच्या समाेर एकमेकांना वा घरातील इतरांसाठी अपशब्द बाेलून अपमान करू नका.जे सांगायचे आहे ते एकांतात समजावून सांगा.त्यासाेबतच हेही लक्षात ठेवा की, लग्नानंतर स्त्रीचा वा काही कुटुंबांमध्ये पुरुषाचाही आपल्या कुटुंबीयांच्या व्यवहार व आचरणावर काेणताही अधिकार राहात नसताे. अशा स्थितीत काेणाही सदस्याच्या व्यवहारासाठी पती वा पत्नीला दाेष देणे कधीही न्यायाचे ठरत नसते.