चैत्र पाडव्यानिमित्त विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेस उत्साहात सुरवात

    21-Mar-2026
Total Views |
 

vitthal 
 
चैत्र पाडव्यानिमित्त विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेस उत्साहात सुरवातचैत्र गुढीपाडवा, साडेतीन मुहूर्तापैकी एक व मराठी नववर्षानिमित्त श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली; तसेच देवाला उन्हाचा त्रास हाेऊ नये म्हणून विठूराया आणि रखुमाईला चंदन लावले जाते. या चंदन उटी पूजेचा प्रारंभ चैत्र पाडव्यापासून झाल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भाेसले यांनी दिली.मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातून भाविक पंढरीत दाखल झाले. फुलांची आरास आणि सणानिमित्त देवाला पारंपरिक अलंकार, साखरेची गाठ,पाेशाखामुळे सावळ्या विठुरायाचे लाेभस रूप अधिकच खुलून दिसत हाेते.चैत्र पाडव्यापासून देवाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला जाताे.
 
उन्हाची दाहकता कमी व्हावी या उद्देशाने शेकडाे वर्षांपासून देवाला चैत्र पाडवा ते मृग नक्षत्र या कालावधीत चंदन उटी केली जाते. यंदा ऑनलाइन पूजेचे बुकिंग सुरू करण्यात आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, 95 ट्नके चंदन उटी पूजेचे बुकिंग झाल्याचे भाेसले यांनी सांगितले.पाडव्यानिमित्त विठूरायाला रेशमी गुलाबी साेवळे आणि निळ्या रंगांची अंगी परिधान करण्यात आले हाेते.देवाला साेन्याची पगडी, काैस्तुभ मणी, हिऱ्यांचे कंगन जाेड, दंडपेट्या, माेत्याचा तुरा, माेत्याची कंठी, नवरत्नांचा हार, तुळशी माळ, मस्त्यजाेड, पितांबर असे अलंकार, तर रखुमाईला चिंतामणी रंगाची नऊवारी रेशमी साडी, साेन्याचा मुकुट, वाक्या जाेड, ताेडे जाेड, तानवड जाेड, चिंचपेटी तांबडी, माेहरांची माळ, पुतळ्याची माळ, लक्ष्मी हार, सरी, कंबर पट्टा आदी अलंकाराने सजवण्यात आले हाेते.