मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त ठाणे, डाेंबिवली, मुंबई आदी शहरांत पारंपरिक उत्साहात भव्य स्वागतयात्रा जल्लाेषात पार पडल्या. विविध संकल्पनांवर आधारित देखावे, महिलांची बाइक रॅली, पारंपरिक पेहरावातील युवकांची उत्साही गर्दी, लेझीम पथक, ढाेल-ताशा पथके, सामाजिक विषयांवरील आकर्षक चित्ररथांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.ठाण्यात श्रीकाैपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने भव्य स्वागतयात्रा काढण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्वागतयात्रेत सहभागी झाले हाेते.सकाळी सातला काैपिनेश्वर मंदिरातून वाजत-गाजत पालखीचे प्रस्थान झाले.यंदा यात्रेत समर्थ ठाणे सश्नत भारत, वंदे मातरम्च्या 150 वर्षांची नाेंद, भारत 2047 आणि नागरी कर्तव्ये या चार प्रमुख संकल्पनांवर आधारित 58 चित्ररथ सादर करण्यात आले.
या चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पर्यावरणविषयक विविध संदेश देण्यात आले. महिलांची बाइक व सायकल रॅली यंदाचे विशेष आकर्षण ठरले.गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या उत्साहात डाेंबिवली शहर रंगून गेले हाेते.पारंपरिक वेशभूषा, ढाेल-ताशांचा गजर, लेझीम पथकांचे सादरीकरण आणि विविध सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथांच्या सहभागामुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले हाेते. श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागतयात्रा संयाेजन समितीच्या वतीने भव्य आणि आकर्षक शाेभायात्रेचे आयाेजन करण्यात आले हाेते.शाेभायात्रेत सहभागी चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.