शिवनेरीच्या पायथ्याशी अतिक्रमणे व नियमबाह्य बांधकामे

    21-Mar-2026
Total Views |
 

shivneri 
 
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि जगाला आदर्श राज्यकारभाराचा धडा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला ऐतिहासिक शिवनेरी किल्ला हा जुन्नर तालुक्याच्या अभिमानाचा व पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, किल्ल्याच्या पायथ्याशी आणि परिसरात उभारल्या जात असलेल्या गगनचुंबी इमारती व वाढते अतिक्रमणांमुळे शिवजन्मस्थळाला धाेका असून, शिवनेरीच्या ऐतिहासिक व नैसर्गिक साैंदर्यावर गंभीर परिणाम हाेत असल्याची चिंता व्य्नत हाेत आहे.सन 2024 पासून शिवप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून या संदर्भात सातत्याने तक्रारी येत असल्याचे जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आणि कार्यसम्राट आमदार डाॅ. बाळासाहेब दांगट यांनी सांगितले. या तक्रारींची दखल घेत त्यांनी वनविभाग, जुन्नर नगरपरिषद, तहसीलदार, जिल्हाधिकारी; तसेच सार्वजनिक बांधकामविभाग यांच्याशी पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली हाेती.
 
मात्र, अद्याप ठाेस कारवाई न झाल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिवनेरी किल्ला हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान असलेला ऐतिहासिक वारसा आहे. अशा पवित्र स्थळाच्या पायथ्याशी अनियंत्रित बांधकामांमुळे किल्ल्याचे दृश्य साैंदर्य झाकले जात असून, पर्यटनालाही बाधा निर्माण हाेत आहे, असे मत व्य्नत करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर आमदार डाॅ. बाळासाहेब दांगट यांनी जुन्नर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुजाता मधुकर काजळे यांना निवेदन देऊन शिवनेरी परिसरातील अतिक्रमण व नियमबाह्य बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. शिवनेरी हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली शिवजन्मभूमी आहे. त्यामुळे या परिसराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शिवप्रेमी व नागरिकांकडून हाेत आहे.