पण अशानं सुटका थाेडीच हाेणार? कृष्णाचा अपरिग्रह एक खाेल अर्थ सूचित करताे. ताे अर्थ हा आहे- ङ्गवस्तू जिथं आहेत तिथंच राहू देत, तुम्ही जिथं आहात, तिथंच रहा. फ्नत दाेहाेंच्यामध्ये सेतू तयार हाेऊ देऊ नका. सेतू बांधू नका.दाेघात ये-जा हाेऊ देऊ नका. तुम्ही स्वत: तुम्हीच रहा.वस्तूंना वस्तूच राहू द्यात. तुम्हीही वस्तूंचे हाेऊन जाऊ नका अन् वस्तू आपल्या आहेत असंही समजू नका. खरं तर या दाेन्ही एकाच नाण्याच्या दाेन बाजू आहेत. वस्तू आपली झाली असं ज्या क्षणी आपणास वाटतं, त्या क्षणी आपणही वस्तूंचे बनता. ज्यावेळी आपण म्हणता ङ्गही वस्तू माझी आहेफ त्याच वेळी आपणही वस्तूचे हाेऊन गेलात याची खूणगाठ मनाशी बांधून ठेवा.मालकी पारस्परिक असते. एखाद्याचे गुलाम झाल्याशिवाय तुम्ही त्याला गुलाम बनवू शकत नाही.
अश्नय आहे ते. आपणास माहिती असाे वा नसाे, पण आपण जेव्हा काेणाला गुलाम बनवता, तेव्हा आपण त्याचे गुलाम हाेऊन जाता. गुलामी पारस्पारिक असते. हाे, एक गुलाम खुर्चीवर बसलेला असताे, दुसरा जमिनीवर असताे.पण त्यामुळे काही फरक पडत नाही. कित्येकदा तर वरच्या गुलामाहून खालचा गुलाम जास्त मु्नत असताे. कारण जाे जमिनीवर बसलेला असताे, त्याचं काम कदाचित् खुर्चीवर बसलेल्या माणसाशिवायही चालू शकतं. पण ताे जाे खुर्चीवर बसलेला गुलाम आहे, त्याचं मात्र जमिनीवरच्या गुलामावाचून काहीही चालणार नाही. त्याची पराधीनता जास्त खाेलवरची आहे, अधिक जड आहे.एखाद्या सम्राटाच्या सगळ्या गुलामांना आपण साेडून दिलं तर गुलाम सम्राटांची काही खास आठवण ठेवणार नाहीत. ते म्हणतील, चला, कचाट्यातून सुटलाे एकदाचे! पण सम्राट ? ताे रात्रंदिवस चिंतित आणि बेचैन राहील. कारण गुलामांच्या विना ताे निष्प्रभ हाेऊन जाताे. ना काेणी असाच ताे हाेताे. सम्राटाविना गुलाम तर काहीसे जास्त बनतील.