देहबाेली फक्त नात्यांना एक भक्कम आधारच देत नाही तर ती प्रभावी व महत्त्वाचीही बनवते. आज एखाद्याला जाणण्या पारखण्यासाठी त्याच्याविषयी काेणाकडे विचारपूस करण्याऐवजी त्याची देहबाेली समजणे अधिक प्रामाणिक व विश्वसनीय मानले जाते.देहबाेली व्यक्तीची मन:स्थिती व अंतर्गत भावनांचा खुलासा करते. जाणून घेऊ या देहबाेलीचे काही प्रकार.
आज लाेकांकडे एखाद्याला स्वत:विषयी सविस्तरपणे सांगण्यासाठी व त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ नसताे.त्यामुळे आज नात्यांच्या निर्मितीत देहबाेलीची भूमिका नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे काेणाशीही बाेलताना आपल्या हावभावांवर ताबा ठेवत उत्साही राहा.
प्रभावी व्यक्तिमत्व व सुदृढ संबंध विकसित करण्यासाठी देहबाेली एक वैज्ञानिक विधी आहे. ही एक कला आहे. त्यामुळे एखाद्याविषयी जाणण्यासाठी त्याच्या हावभावातून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा.
आपली उभे राहण्याची पद्धत व एखाद्याशी हात मिळवण्याची पद्धत फक्त आपले त्या व्यक्तीसाेबतचे संबंध दर्शवीत नाही तर आपले व्यक्तिमत्वही दर्शवते. तयामुळे हात मिळवताना उबदारपणा दर्शवायला हवा. जिथे उभे राहाल तिथे सहजस्थितीत उभे राहायला हवे.
कित्येकदा लाेक हात बांधून बाेलतात. जे नर्व्हसनेस दर्शवते.बाेलताना पाय हलवणे, नखे कुरतडणे, केसांशी व दागिन्यांशी खेळणे, वारंवार खिशात हात घालणे, कंबरेवर हात ठेवून बाेलणे व्यक्तिमत्व प्रभावी बनवण्यापासून राेखते. असे कधीही करू नये.
हावभाव संवादाची किल्ली आहे. हावभावाने समाेरच्या व्यक्तीला तर जाणाच शिवाय आपल्या मर्यादाही लक्षात ठेवा. एखाद्याशी बाेलताना वारंवार डाेळे मिचकावणे आपल्याला त्या बाेलण्यात रूची नसल्याचे दर्शवते.
एखाद्याशी बाेलताना त्याच्या व्यवहाराचा वा देहबाेलीसंबंधित अर्थ त्यावेळच्या संदर्भाच्या आधारेच काढा.
जेव्हा आपण एखाद्या सभा वा समारंभात बसला असाल तेव्हा आपली काॅलर ताेंडाने चावण्याचा प्रयत्न कधीही करू नये. कारण असे करणे हे दर्शवते की, आपल्याला काहीही कळत नाही.तसेच एखाद्याशी बाेलताना चुट्नया वाजवू नयेत कारण ते त्या व्यक्तीत आपली अरुचीसाेबतच आपल्या असभ्यपणाचे द्याेतक असते.
स्पर्शाविषयी संवेदनशील असणेही देहबाेलीचाच अत्यावश्यक भाग आहे. यातूनही इतरांचा समजण्यात व त्यात स्वत:ला स्थापित करण्यास मदत मिळते.
गंभीरपणे व प्रभावीपणे बाेलणेपाहणे शिकून काेणीही देहबाेलीत प्रावीण्य मिळवू शकते.