मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपुरात मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत

    21-Mar-2026
Total Views |
 
 
 

PM 
 
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात देशाची गुढी उंचच उंच जात राहाे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुढीपाडवा मराठी नववर्ष दिनाच्या कार्यक्रमात सहभागी हाेताना दिल्या. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि नववर्ष अभिनंदन समितीने नागपुरात लक्ष्मीनगर चाैकात नववर्ष दिनानिमित्ताने शाेभायात्रा आणि रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर या प्रसंगी उपस्थित हाेती. तात्या टाेपे नगरातील श्री गणेश मंदिरापासून या शाेभायात्रेला सुरुवात झाली.त्यात मुख्यमंत्री, अभिनेत्री सई ताम्हणकर, ट्रस्टचे अध्यक्ष आमदार संदीप जाेशी आणि इतर मान्यवरांसह महिलांचे ढाेल पथक, रामायणातील पात्रांच्या वेशभूषा केलेले कलाकार व माेठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले हाेते. या प्रसंगी सामूहिक रामरक्षा पठण; तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुढी आणि श्रीरामपंचायतनाचे पूजन करण्यात आले.