माणसाचा स्वभाव नेहमी निसर्गाशी जाेडून पाहायला हवा.त्याच्या स्वभावाचा वेगळा अभ्यास करून आपण आपले विचार दैवी चैतन्याशी जाेडू शकताे. त्याच्या अस्तित्वाचा या सृष्टीच्या सर्व अवयवांवर नेहमी प्रभाव असताे.यापासून स्वत:ला वेगळे करणे कठिण असते.माणूस कायमच बाह्य जगात आपला पुरुषार्थ दाखवत राहिला आहे. जर त्याचा थाेडासा जरी अंश आपण स्वत:त प्रवेश करण्यासाठी लावला तर ते एक जागरण हाेईल.इस्त्राेचे माजी प्रमुख सिव्हन म्हणत की, आपल्याला जे हवे असते ेच मिळेल असे नाही. त्यामुळे जे मिळते ते सर्वश्रेष्ठ बनवण्याचा प्रयत्न करायला हवा.
यासाठी गरज आहे स्वत:चे अवलाेकन करण्याची. निसर्ग आपल्यातील ऊर्जा जागृत करण्याचा संदेश देत आहे. ताे नेहमी आपल्याला याेग्य बनवण्यासाठी प्रयत्नशील राहात असताे. त्याने स्वभावत:च सर्वांच्या शरीरात शक्तिचे बीज ठेवलेले असते. जेव्हा आपण मनाच्या अग्नीतून ध्यान व तप निर्माण करताे तेव्हा ती बीजशक्ती तेजात बदलून जाते. तपध्यान-याेग व मानसिक चेतनेच्या विकासासाेबत आपण जेव्हा जीवनात आराेहण करताे तेव्हा भीती नष्ट हाेते व प्रभुत्वाची लालसा संपते.वनवासाला जाताना श्रीरामांचा उदार विवेक आणि अंतर्ज्ञानाचा बाेध त्यांना एक पीडित हाेण्याची जाणीव देत नाही. ते पाहतात की, यामुळे त्यांना समाजापासून दूर निसर्गासाेबत तपस्या व आपली साधना पूर्ण करण्यची संधी मिळेल.दृष्टीला विस्तार मिळेल.अनुभवाला वैविध्य व नवे पैलू प्राप्त हाेतील.त्यांनी संग्रहाची भावना व आनंदाचा भाेग जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवले नाहीत. यामुळे ते आपल्या क्षमतेला दैवी रूप देऊ शकले.