काेणत्याही क्षेत्रात एक किंवा दाेनच सेवा पुरवठादार असले की ग्राहक भरडले जाणार हे निश्चित असतं. असल्या एकाधिकारशाहीला किंवा दाेनाधिकारशाहीला प्राेत्साहन देणारं सरकार त्यांना ग्राहकांची पिळवणूक करण्यासाठी उत्तेजन देत असतं.विमानसेवेच्या क्षेत्रात अशीच ड्युऑपाेली तयार केली गेल्यामुळे इंडिगाे या एका कंपनीने सगळ्या देशाची विमानसेवा कशी वेठीला धरली, ते आपण पाहिलेलं आहेच नुकतंच. या ड्युऑपाेलीचा फटका आता दूरसंचार क्षेत्रातही बसताे. इथे एअरटेल नाहीतर जिओ हेच पर्याय. हे दाेन्ही सेवा पुरवठादार वेगवेगळे महिन्याचे प्लॅन देतात प्रिपेडचे.
म्हणतात महिन्याचे, देतात 28 दिवसांचा प्लॅन.त्यात सर्वांत स्वस्त प्लॅनमध्येही दिवसाला दाेन जीबी डेटा असताेच फ्री.या देशातले गाेरगरीब लाेक ज्यात इंटरनेटची गरज नाही, असा बेसिक फाेन वापरतात. त्यालाही गरज नसताना इंटरनेटसह प्लॅन घ्यावाच लागताे. ही लूट आहे. ज्याला साधा प्लॅन हवा त्याला ताे उपलब्ध असलाच पाहिजे.त्यासाठी आवाज उठवला खासदार राघव चड्ढा यांनी. याच राघव चड्ढा यांच्यामुळे आता विमानतळावर स्वस्त सामाेसा आणि चहा उपलब्ध झालेला आहे.मुळात गाेरगरिबांची कणव असल्याचं दाखवून सत्तेत आलेल्या लाेकांना गाेरगरिबांच्या या छाेट्या छाेट्या गरजांचं भान राहात नाही, ही लूट दिसत नाही, हेच आश्चर्य नाही का?