कन्या

    19-Mar-2026
Total Views |
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामाबाबत अधिक दक्ष व याेजनाबद्ध राहाल.जीवनात शिस्त टिकवून ठेवल्यास तुम्हाला त्याचे उत्तम परिणाम मिळू शकतात.कुटुंब व कार्यक्षेत्र दाेन्ही जागी संतुलन राखण्याची गरज आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामाविषयी तुम्ही गांभीर्याने विचार कराल. नवी जबाबदारी मिळू शकते.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअरक्षेत्रात हळू हळू प्रगतीचे संकेत मिळतील. व्यापाऱ्यांना जुन्या गुंतवणूक व संपर्कांतून फायदा मिळू शकताे.कामामध्ये दक्षता व धैर्य बाळगणे आवश्यक असेल. नाेकरदारांसाठी ही वेळ स्वत:ची याेग्य दाखवण्याची राहील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या काैटुंबिक जीवनात सामंजस्य टिकून राहील. जाेडीदारासाेबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा हाेण्याची श्नयता आहे. प्रेमसंबंधात विश्वास आणि समजुतदारपणा टिकवून ठेवणे आवश्यक असेल. कुटुुंबातील एखाद्याचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकताे.
 
 आराेग्य : आराेग्याबाबत हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य असणार आहे.पण तुम्हाला पाेटाच्या व पचनासंबंधित समस्यांचा त्रास हाेण्याची श्नयता आहे. त्यामुळे तुम्ही खाण्या-पिण्याबाबत संयम राखायला हवा. प्राणायाम व पुरेशी झाेप याद्वारे तुम्ही स्वत:ला सुदृढ ठेवू शकाल.
 
 शुभदिनांक : 16, 20, 21
 
 शुभरंग : हिरवा, पांढरा, गुलाबी
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार
 
 दक्षता : या आठवड्यात अनावश्यक चिंता करणे व तणाव घेणे टाळावे.छाेट्या गाेष्टींचा जास्त विचार करून मानसिक थकवा जाणवू शकताे.
 
 उपाय : या आठवड्यात बुधवारी श्रीगणेशाची पूजा करून ॐ गं गणपतये नम: या मंत्राचा 21 वेळा जप करावा.