दगडूशेठ गणपती ट्रस्टचा आजपासून संगीत महाेत्सव

    19-Mar-2026
Total Views |
 
 

trust
 
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजेच 19 ते 23 मार्चपर्यंत संगीत महाेत्सव आयाेजिण्यात आला आहे. हा महाेत्सव राेज सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात हाेणार आहे. या महाेत्सवात दिग्गजकलाकारांसह युवा कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.हा संगीतसाेहळा अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली. गुढीपाडव्याला सायंकाळी 4.45 वाजता गणेशपूजनाने संगीत महाेत्सवाला प्रारंभ हाेणार आहे. तसेच सायंकाळी 6.45 वाजता महाेत्सवाचे औपचारिक उद्घाटन हाेईल. संगीत महाेत्सव दाेन सत्रांत हाेणार आहे.रसिकांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चाैकातील प्रभात थिएटरसमाेरील नूमवि मराठी शाळेत करण्यात आली आहे.संगीत महाेत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, पुणेकरांनी माेठ्या संख्येने महाेत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.