वृषभ

    19-Mar-2026
Total Views |

Horoscope 
या आठवड्यात तुमच्या जीवनात धैर्य व स्थैर्याची परीक्षा होऊ शकते. अनेक बाबतीत तुम्हाला हुशारीने व संयमाने काम करायला हवे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात पण तुम्ही त्या संतुलितपणे सांभाळाल. कार्यक्षेत्रात तुमचे प्रयत्न हळू हळू परिणाम देऊ लागतील. घाई टाळणे श्रेयस्कर राहील.
 
■ नोकरी-व्यवसाय या आठवड्यात व्यवसायात नव्या योजनांवर विचार तर असेल पण त्या लागू करण्यासाठी थोडी वाट पाहणे उत्तम ठरेल. व्यापारात देवघेव करताना दक्षता राखा. नोकरदारांनी आपल्या कामाकडे जास्त लक्ष देण्याची गरज असेल कारण वरिष्ठांची तुमच्यावर नजर राहील.
 
■ नातीगोती या आठवड्यात कौटुंबिक जीवनात गोडवा राहील. जीवनसाथीसोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. ज्यामुळे संबंध अधिक मजबूत होतील. प्रेमसंबंधात विश्वास टिकवणे आवश्यक असेल. क्षुल्लक गोष्टीवरून गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. वृद्धांचे आशीर्वाद मनःशांती देईल.
 
■ आरोग्य या आठवड्यात तुमची तब्बेत सामान्य राहील पण खाण्या- पिण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असेल. तेलकट व जड अन्न टाळावे. हवामान बदलामुळे सर्दी-पडसे वा घसादुखीचा त्रास संभवतो. नियमितपणे योग व प्राणायाम करणे तब्बेतीसाठी उत्तम राहील.
 
■ शुभदिनांक : १६, २०,२१
 
■ शुभवार बुधवार, शुक्रवार
 
शुभरंग हिरवा, पांढरा, गुलाबी
 
■ दक्षता या आठवड्यात आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावा.
 
■ उपाय : या आठवड्यात शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करावीव ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः मंत्राचा २१ वेळा जप करावा. एखाद्या गरीबाला पांढरी मिठाई
द्यावी.