एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक ताेडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधान भवनात बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले; तसेच एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर माेफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. एसटीत कार्यरत सेवा श्नती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने चालक-वाहकांवरील कारवाई, आगार व्यवस्थापनातील अडचणी तसेच काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे निर्माण हाेणाऱ्या समस्यांकडे सरनाईक यांचे लक्ष वेधले हाेते.
या पार्श्वभूमीवर संघाचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खाेत तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाेबत सरनाईक यांनी चर्चा केली. एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणारे पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले. कर्मचारी संघटनांशी नियमित संवाद साधून त्यांच्या समस्या साेडवू.कर्मचाऱ्यांच्या अडचणींवर शक्य तितक्या लवकर कार्यवाही केली जाईल.त्यामुळे सामान्य प्रवाशांना अधिक चांगली सेवा देणे शक्य हाेईल. एसटी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून सामाेपचाराने ताेडगा काढावा, असे निर्देश सरनाईक यांनी दिल