धनु

    19-Mar-2026
Total Views |
 
 
Horoscope
या आठवड्यात तुमच्या जीवनात उत्साहाचा व नव्या ऊर्जेचा संचार राहील. तुम्ही तुमच्या ध्येयाबाबत गंभीर राहाल व ते गाठण्यासाठी सतत प्रयत्न कराल. काैटुंबिक जीवनात काही महत्त्वाच्या चर्चा हाेऊ शकतात. ज्यामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची असेल.आठवड्याच्या शेवटी शुभ समाचार मिळू शकताे.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअरक्षेत्रात प्रगतीचे संकेत मिळू शकतात. व्यावसायिकांना नव्या याेजनांवरर काम करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही एखादे नवे काम सुरू करू इच्छित असाल तर प्रथम याेजना बनवून नंतरच पाऊल उचलावे. नाेकरदारांना कामात वरिष्ठांची मदत मिळेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या काैटुंबिक जीवनात सुख-शांती टिकून राहील. जीवनसाथीसाेबतच्या संबंधात माधुर्य व सामंजस्य वाढेल. प्रेमसंबंधातही सकारात्मकता टिकून राहील. कुटुंबीयांसाेबत एखाद्या धार्मिक वा सामाजिक कार्यक्रमात सामील हाेण्याची संधी लाभेल.
 
 आराेग्य : या आठवड्याच्या पहिल्या दिवशी दात वा हिरड्या दुखण्याची श्नयता राहील. मायग्रेन, कणा व डाेळ्यांत सूज या समस्यांत सावध राहायला हवे. त्यामुळे काहीसा थकवा जाणवू शकताे. ताे टाळण्यासाठी तुम्ही तुमचे खाणे-पिणे वेळच्या वेळी घ्यायला हवे.
 
 शुभदिनांक : 17, 18, 19
 
 शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ते व्यवस्थित वाचावेत.
 
 उपाय : या आठवड्यात गुरुवारी श्रीविष्णूचे पूजन करावे. ॐ नमाे भगवते वासुदेवाय मंत्राचा 21 वेळा जप करावा. गरजूंना पिवळे वस्त्र दान करावे.