मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षात प्रवासी वाहतुकीतून 7296 काेटींचे उत्पन्न मिळवले असून, मागील वर्षाच्या तुलनेत प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. लाेकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील वाढती प्रवासी संख्या, सणासुदीच्या काळात वाढवलेल्या विशेष गाड्या व तिकीट आरक्षणात वाढ झाल्याने रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली आहे.मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लाेकलमधील प्रवासी संख्येत सातत्याने वाढ हाेत आहे; तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही प्रवाशांचा माेठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवासी उत्पन्नात चांगली भर पडली आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपाययाेजना करत असून, भविष्यात प्रवासी संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्य्नत करण्यात येत आहे.मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये (फेब्रुवारी 2026 पर्यंत) एकूण 150.35 काेटी प्रवाशांची वाहतूक केली.गेल्या वर्षी याच कालावधीत 147.66 काेटी प्रवाशांची वाहतूक करण्यात आली हाेती.
2025च्या तुलनेत 2026 मध्ये त्यात 1.82 ट्नके वाढ झाली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात लाेकलमधून 131.49 काेटी प्रवाशांनी प्रवास केला, तर गेल्या वर्षी 130.03 काेटी प्रवाशांनी प्रवास केला हाेता. 2025-26 या आर्थिक वर्षात 18.85 काेटी प्रवाशांनी मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि इतर गाड्यांमधून प्रवास केला. मागील वर्षी 17.62 काेटी प्रवाशांनी प्रवास केला हाेता. मध्य रेल्वेने गेल्या वर्षी 12.82 काेटी, तर फेब्रुवारीत 13.01 काेटी प्रवाशांची वाहतूक केली.मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2025-26 (फेब्रुवारी 2026 पर्यंत) दरम्यान 16,055.10 काेटी रुपयांचे मूळ प्रवासी आणि वाणिज्यिक उत्पन्न नाेंदवले आहे. यात प्रवासी वाहतुकीतून 7296.73 काेटी, मालवाहतुकीतून 7487.45 काेटी, इतर काेचिंगचे 703.41 काेटी व विविध प्रकारचे 567.51 काेटींचे उत्पन्न मिळवले.