प्राचीन काळापासून माणसाला घाेड्यांच्या खेळाचा नाद आहे. इजिप्त, बाबिलाेनिया, सीरिया या देशांमध्ये जुन्या काळी घाेडयांच्या शर्यती हाेत.हाेमरच्या काव्यात रथांच्या शर्यतीचा उल्लेख आहे. म्हणजे खिस्त जन्मापूर्वी आठ शतके ग्रीक लाेकांमध्ये रथांच्या शर्यती हाेत.आजच्या घाेडयांच्या शर्यतीचे मूळ इंग्लंडात आहे. 12 व्या शतकापासून इंग्लंडमध्ये घाेडयांच्या शर्यती चालू आहेत. या शर्यताेंसाठी जातिवंत घाेडयाच्ची पैदास व संगाेपन केले जाते. 17 व्या व 18 व्या शतकार जातिवंत घाेडयांच्या पैदाशीला खरा बहर आला.अरेबिया, तुर्कस्तान, पर्शिया या पाैर्वात्या देशांमधून जातिवंत घाेडे इंग्लंडात नेले जात आसत.1751 साली इंग्लंडात जाॅकी ्नलबची स्थापना झाली.इग्लंडातील राजघराणे व उमराव घराणी जातिवंत घाेडे पाळू लागली व त्यांना शर्यतीमध्ये पळवू लागली साहजिकच इतर देशांमधील या खेळाकडे लक्ष वळले.भारतातही घाेडयांच्या शर्यती खूप लाेकप्रिय आहेत. कलकत्ता, मुंबई, बंगलाेर, पुणे इत्यादी शहरांमध्ये घाेडयांच्या शर्यतींचे माेसम गाजतात.