ओशाे - गीता-दर्शनताे नाेकर दु:खी अन् व्यथित अशासाठी हाेईल की आता त्याचा त्या नसलेल्या घड्याळाशीही एक ममत्वाचा संबंध प्रस्थापित झाला, ते मिळणार हाेतं, माझं हाेणार हाेतं.आता त्याने आत जागा बनवली.आतापर्यंत ते घड्याळ बाहेर भिंतीवर लटकलं हाेतं. आता ते त्याच्या हृदयाच्या एका काेपऱ्यात लटकलं आहे.जेव्हा वस्तू बाहेर असतात, त्यांनी आत घर केलेलं नसतं. त्यांचा उपयाेग तर चालू असताे पण त्यांची आस्नती आत निर्मित हाेत नसते- तेव्हा कृष्णाला अभिप्रेत असलेला अपरिग्रह फलित हाेताे. जीवन जगायचं पूर्णपणे. पण असं की, जीवन आपल्याला शिवणार सुद्धा नाही. वस्तूमधून, माणसांमधून जायचं आहे अवश्य. पण असं अस्पर्शित.म्हणून अपरिग्रहाच्या ज्या इतर व्याख्या आहेत त्या सरळ आहेत.
पण कृष्णाची व्याख्या अवघड आहे. इतर ज्या व्याख्या आहेत त्या साधारण आहेत, ठीक आहेत- ज्या वस्तूंशी माेह निर्मित हाेताे त्या गेल्या की थाेड्या दिवसांनी मन त्या गाेष्टी विसरूनही जातं.माेठ्यातल्या माेठ्या गाेष्टीही मन विसरून जातं. साेडून द्या, बाजूला सरका. मग मन किती दिवस लक्षात ठेवील! त्याची स्मरणश्नती कमजाेर आहे. ते विसरून जाईल.ममत्वाची नवी ठिकाणे बनवून घेईल, जुनी विसरून जाईल.ज्यावर आपण खूप प्रेम केलं ताे माणूस मरूनही गेला. तरी ताे किती दिवस लक्षात राहील? माणसं रडतात, दु:खीहाेतात, मग सारं विसरून जातात. नंतर साऱ्या जखमा भरून निघतात, यात्रा पुन्हा चालू हाेते.पुन्हा नवे संबंध निर्माण हाेतात... काेणाच्या मरण्यानं यात्रा थांबते? काेणती वस्तू हरवल्यानं यात्रा थांबते? काहीएक थांबत नसतं. सगळं पुन्हा चालू राहतं. उदा.मध्येच थाेडा अडथळा हाेताे म्हणून गाडी थाेडी थबकलेली असते.