नागपूर आयआयएमला इक्युबेशन सेंटर म्हणून महाराष्ट्र सरकारची मान्यता

    19-Mar-2026
Total Views |
 
 

Nagpur 
 
विदर्भातील नवउद्याेगांचे (स्टार्ट अप) जाळे अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता साेसायटीने त्यांच्या इन्क्युबेशन सेंटरसाठी दाेन दिवसीय धाेरणात्मक कार्यशाळेचे आयाेजन केले हाेते. या कार्यशाळेत राज्यभरातील इन्क्युबेशन सेंटर प्रमुख, शैक्षणिक संस्था; तसेच परिसंस्थेतील विविध घटक सहभागी झाले हाेते. या कार्यशाळेत राज्य नाविन्यता साेसायटी आणि नागपूरच्या आयआयएम संस्थेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. यामुळे आयआयएम नागपूरला अधिकृतपणे राज्य नाविन्यता साेसायटीच्या इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली. यामुळे विदर्भातील नवाेपक्रम, उद्याेजकता आणि नवउद्याेगांच्या वाढीस चालना मिळणार आहे. काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा यांनी राज्यात मजबूत व सर्वसमावेशक नवउद्याेग उभारण्याबाबत राज्य शासनाची कटिबद्धता अधाेरेखित केली. अशा संस्थात्मक सहकार्यामुळे नवउद्याेगांना याेग्य मार्गदर्शन, साह्य व संधी उपलब्ध हाेऊन प्रादेशिक विकासास हातभार लागेल, असे त्यांनी नमूद केले. साेसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले, की राज्यात 29 सहाय्यित इन्क्युबेशन सेंटरचे मजबूत जाळे उभारण्यात आले आहे.