तूळ

    19-Mar-2026
Total Views |
 

Horoscope 
या आठवड्यात तुमच्यासाठी संतुलन व समजुतदारपणाची भूमिका महत्त्वाची राहील. तुम्ही अनेक प्रकरणांत मध्यस्थाची भूमिका बजावू शकता व लाेकांमध्ये सामंजस्य स्थापित करण्याचा प्रयत्न कराल. सामाजिक व काैटुंबिक जीवनात तुमची सक्रियता वाढेल. एखादे जुने काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमच्यासाठी नव्या संधी बनू शकतात. व्यावसायिकांना एखाद्या नव्या संपर्कातून फायदा हाेण्याची श्नयता आहे. व्यापारात याेजनापद्धतीने केलेले प्रयत्न यश मिळवून देऊ शकतात.नाेकरदारांना जास्त श्रम करावे लागतील. त्याचे परिणामही चांगले हाेतील.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या काैटुंबिक जीवनात प्रेम व जिव्हाळा राहील. जीवनसाथीसाेबतच्या संबंधात गाेडवा येईल. प्रेमसंबंधात परस्परांवरील विश्वास वाढेल. एखाद्या प्रिय व्यक्तीसाेबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.कुटुंबासाेबत एखाद्या धार्मिक वा सामाजिक कार्यक्रमात सामील हाेऊ शकता.
 
 आराेग्य : या आठवड्यात आराेग्य सामान्य राहील पण थकवा व अशक्तपणा जाणवू शकताे. नियमित व्यायाम व संतुलित आहाराने स्वत:ला सुदृढ राखू शकता. डाेळे व त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची श्नयता आहे. तरी त्याबाबत सावध राहावे. प्राणायाम व ध्यान उपयुक्त ठरेल.
 
 शुभदिनांक : 16, 20, 21
 
 शुभरंग : हिरवा, पांढरा, गुलाबी
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणत्याही आर्थिक देवघेवीबाबत दक्षता बाळगावी.विचार न करता गुंतवणूक करू नये.
 
 उपाय : या आठवड्यात शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करावी व ॐ श्रीं महालक्ष्म्यै नम: मंत्राचा 21 वेळा जप करावा. गरीबाला पांढरे वस्त्र द्यावेत.