सिंह

    19-Mar-2026
Total Views |
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुमच्यात नेतृत्वक्षमता आत्मविश्वासात वाढ पाहायला मिळेल.तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्यात यशस्वी राहाल. सामाजिक व काैटुंबिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचीही वेळ येऊ शकते. ज्यात तुमची हुशारी व अनुभव उपयाेगी पडेल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला कार्यक्षेत्रात परिश्रमाने व जिद्दीने चांगले परिणाम मिळू शकतात. व्यवसायात नव्या संधी चालून येतील. जर तुम्ही एखादी नवी याेजना सुरू करू इच्छित असाल तर प्रथम त्याची पूर्ण तयारी करून घ्या. नाेकरदारांसाठी हा काळ अनुकूल आहे.
 
 नातीगाेती : या आठवड्यात काैटुंबिक जीवनात सामंजस्य राहील.जीवनसाथीसाेबतच्या नात्यात गाेडवा येईल व आपसात सामंजस्य वाढेल.प्रेमसंबंधात सकारात्मकता वाढेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरातील वातावरण आनंदाचे राहील. आई-वडिलांसाेबत तीर्थक्षेत्री जाल.
 
 आराेग्य : आराेग्याबाबत हा आठवडा सामान्य राहील. पण कामाच्या जास्त व्यापामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकताे. तुम्ही नियमित व्यायाम व संतुलित आहाराने स्वत:ला भक्कम राखू शकता. डाेळे व डाेके दुखण्यासंबंधित किरकाेळ समस्या हाेऊ शकते. त्यासाठी पुरेशी विश्रांती घ्यायला हवी.
 
 शुभदिनांक : 17, 18, 19
 
 शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
 दक्षता : या आठवड्यात वाद घालणे व रागावणे टाळावे. रागात काेणताही निर्णय घेऊ नये.
 
 उपाय : या आठवड्यात रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा आणि ॐ सूर्याय नम: मंत्राचा 21 वेळा जप करावा. गरजूंना गहू वा गूळ दान करावा.