मिथुन

    19-Mar-2026
Total Views |
 
 
 
Horoscope
या आठवड्यात तुमच्या जीवनात नव्या ऊर्जेचा व उत्साहाचा संचार हाेईल.तुम्ही तुमच्या विचार व याेजनांबाबत खूप सक्रिय राहाल. अनेक बाबतीत तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात, पण त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही त्वरित निर्णय घेण्याची गरज असेल. एखादा जुना मित्र भेटू शकताे.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअर व व्यवसायात नव्या संधी मिळू शकतात. व्यापारी वर्गाला नव्या संपर्कामुळे फायदा हाेण्याची श्नयता आहे.नाेकरदारांना आपल्या कामात रचनात्मकता दाखवण्याची संधी मिळेल. पण काेणत्याही नव्या प्राेजे्नटची सुरुवात करण्यापूवी व्यवस्थित याेजना बनवावी.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात माधुर्य राहील. तुम्ही प्रियजनासाेबत भविष्याबाबत महत्त्वाची चर्चा करू शकता. विवाहित मंडळींसाठी हा काळ उत्तम असेल व जीवनसाथीची साथ मिळेल. कुटुंबात एखाद्या शुभकार्याची याेजना तयार हाेण्याचीही श्नयता दिसून येत आहे.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील. पण तुम्हाला मानसिक थकवा जाणवण्याची श्नयता आहे. जादा कामामुळे तुमचा तणाव वाढू शकताे. ते टाळण्यासाठी वरचेवर आराम करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम व संतुलित आहाराद्वारे तुम्ही स्वत:ला सुदृढ व तरतरीत ठेवू शकता.
 
 शुभदिनांक : 16, 20, 21
 
 शुभरंग : हिरवा, पांढरा, गुलाबी
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार
  
 दक्षता : या आठवड्यात काेणत्याही प्रकारच्या अफवा व अनावश्यक चर्चे पासून दूर राहावे.
 
 उपाय : या आठवड्यात बुधवारी श्रीगणेशाची पूजा करून ॐ गं गणपतये नम: या मंत्राचा 21 वेळा जप करावा. गरजूंना हिरवी भाजी वा हिरवे वस्त्र दान करावे.