इथेनाॅलवर चालणारा स्टाेव्ह तयार करण्याचा प्रयाेग यशस्वी

    19-Mar-2026
Total Views |
 


ethanol
 
 
 
गॅसचा तुटवडा अनेक भागांत जाणवू लागला आहे. त्यामुळे काही ठिकाणी हाॅटेल, लहान उद्याेग आणि व्यावसायिकांनी पर्यायी मार्ग शाेधण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील काेपरगाव तालुक्यात एक वेगळा प्रयाेग समाेर आला आहे. संजीवनी उद्याेग समूह आणि शंकरराव काेल्हे सहकारी साखर कारखान्याने व्यावसायिक गॅसला पर्याय शाेधण्याचा प्रयत्न करत इथेनाॅलवर चालणाऱ्या स्टाेव्हचे संशाेधन केले आहे. पुण्यातील तांत्रिक संस्थेच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेला हा प्रयाेग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.काेपरगाव तालुक्यातील शंकरराव काेल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी उद्याेग समूह यांनी संयुक्तपणे या प्रयाेगाची सुरुवात केली आहे. इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे उद्याेग क्षेत्रावर माेठा आर्थिक ताण येत असताना स्वस्त आणि स्थानिक स्तरावर उपलब्ध हाेणाऱ्या पर्यायांचा शाेध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
या पार्श्वभूमीवर इथेनाॅलवर चालणारा स्टाेव्ह तयार करण्याचा प्रयाेग करण्यात आला आहे. हा स्टाेव्ह विशेषतः हाॅटेल, कॅन्टीन आणि व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त ठरू शकताे, असा दावा या प्रयाेगामागील संशाेधकांनी केला आहे.काेपरगावातील शंकरराव काेल्हे सहकारी साखर कारखान्याने यापूर्वीही पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कारखान्याने सीएनजी प्लांट उभारून सीएनजी गॅसचे उत्पादन सुरू केले आहे. यामुळे साखर उद्याेगाशी संबंधित उप उत्पादनांचा उपयाेग करून ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला.आता त्याच धर्तीवर इथेनाॅलवर आधारित स्टाेव्ह तयार करण्याचा प्रयाेग करण्यात आला आहे. यामागील उद्दिष्ट म्हणजे उद्याेगांसाठी स्वस्त व सहज उपलब्ध इंधन पर्याय तयार करणे.या स्टाेव्हचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याचा कमी खर्च. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या तुलनेत इथेनाॅलवर चालणाऱ्या स्टाेव्हचा खर्च कमी येऊ शकताे, असा दावा करण्यात येत आहे.
 
भारतामध्ये सध्या इथेनाॅल निर्मिती माेठ्या प्रमाणात हाेत आहे. त्यामुळे या उपलब्धतेचा उपयाेग स्वयंपाकासाठी किंवा व्यावसायिक वापरासाठी केला तर इंधन खर्चात बचत हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रयाेगाबाबत बाेलताना संजीवनी उद्याेग समूहाचे चेअरमन विवेक काेल्हे म्हणाले, आज पेट्राेलमध्ये इथेनाॅल मिक्स करायला परवानगी मिळाली आहे. मात्र त्यानंतरही जवळपास 1000 काेटी लिटर अतिरिक्त इथेनाॅल आजही उपलब्ध आहे. सरकारने जर इथेनाॅल गॅस किंवा इथेनाॅल स्टाेव्ह सारख्या संशाेधनाला परवानगी दिली तर माेठा फायदा सहकारी सेक्टरला हाेईल यात शंका नाही. या प्रकल्पामागील टीमने दाेन वर्षांपूर्वी पुण्यातील एका कंपनीसाेबत करार करून संशाेधन पूर्ण केले आहे. मात्र इथेनाॅलवर चालणाऱ्या स्टाेव्हसाठी अजून स्पष्ट धाेरण नसल्यामुळे हा प्रकल्प सध्या थांबवण्यात आला आहे.याबाबत विवेक काेल्हे म्हणाले, जर इथेनाॅल गॅस किंवा इथेनाॅल स्टाेव्हला सरकारने परवानगी दिली तर ट्रान्सपाेर्टवर हाेणारा माेठा खर्च वाचेल