‘राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, ही राज्य शासनाची भूमिका आहे. एज्युकेट गर्ल्ससारख्या अनुभवी संस्थेच्या सहकार्यामुळे राज्यातील मु्नत शाळा प्रणाली अधिक बळकट हाेईल आणि शिक्षण अर्धवट राहिलेल्या विशेषतः मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी मिळेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.राज्यातील मु्नत शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि औपचारिक शिक्षण व्यवस्थेमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना लवचिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली; तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने शालेय शिक्षण विभागाने ‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेशी नुकताच सामंजस्य करार केला.राज्यात प्रत्येकाला शालेय शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री कायम आग्रही आहेत. पूर्व प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणापर्यंत विद्यार्थीसंख्या कायम राहावी, यासाठी शासनामार्फत विविध उपाययाेजना करण्यात येत आहेत.
तथापि, काेणत्याही कारणास्तव शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.या भागीदारी अंतर्गत राज्य मु्नत शाळा मंडळाला साह्यासाठी टेक्निकल असिस्टन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जनजागृती माेहिमा राबवणे, वंचित समुदायांपर्यंत पाेहाेचणे; तसेच दहावी व बारावीचे शिक्षण पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुन्हा शिक्षणात सामावून घेण्यासाठी विविध उपाययाेजना राबविण्यास मदत केली जाणार आहे.या उपक्रमात विशेषतः मुली, महिला विद्यार्थी; तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांपर्यंत पाेहाेचण्यावर भर दिला जाईल. त्याचप्रमाणे मु्नत शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शैक्षणिक संसाधने आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण व्यवस्था विकसित करण्याबराेबरच मु्नत शिक्षण कार्यक्रमांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन पद्धती विकसित करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.