सिडकाे क्षेत्रात पाणी पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययाेजना : मिसाळ

    19-Mar-2026
Total Views |
 

Cidco
 
सिडकाे क्षेत्रात पाणी पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययाेजना : मिसाळनवी मुंबईत सिडकाे क्षेत्रात सध्या 342 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा हाेत असून, 2026 च्या गरजेनुसार एकूण 365 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असल्यामुळे सुमारे 30 दशलक्ष लिटर तूट भरून काढण्यासाठी तातडीने उपाययाेजना करत आहाेत. ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर सिडकाे क्षेत्रात पाणी वितरणासाठी स्टेम्ससारखी यंत्रणा उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.खारघर, कामाेठे, नवीन पनवेल आणि तळाेजा या भागांत पाणीपुरवठ्यात काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. सध्या पातळगंगा, माेरबे, थेटवणे आणि बारवी या स्राेतांमधून सिडकाेला 342 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जाताे. सिडकाेला माेरबे धरणातून सध्या 59 दशलक्ष लिटर पाणी मिळत असून, सिडकाेने या धरणासाठी पूर्वी 108 काेटींचा खर्च केला हाेता.
 
त्यामुळे या निधीच्या बदल्यात नवी मुंबईकडून सिडकाेला 90 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा किंवा रक्कम परत करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत असल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले.खारघर, कामाेठे, नवीन पनवेल आणि तळाेजा या भागात पाणीपुरवठ्याचा तुटवडा दूर करण्यासाठी काही तातडीचे उपाय याेजना करत आहाेत. माेरबे धरणात 100 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक आहे. ते पाणी नवी मुंबईने डिसेंबरपर्यंत सिडकाेला उपलब्ध करून द्यावे हा निर्णय घेतला पाहिजे. हे पाणी उपलब्ध झाल्यास तात्काळ तूट दूर करता येईल.जेएनपीटीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या दिले जाणारे 14 दशलक्ष लिटर पाणी सिडकाेकडे वळवण्याचा निर्णयही आगामी कालावधीत घेऊ. तसेच, न्हावा शेवा प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण हाेणार असून, त्यातून सिडकाेला सुमारे 69 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध हाेईल. त्यामुळे या भागातील भविष्यकालीन लाेकसंख्या आणि सध्या लागणारा पाण्याचा तुटवडा दूर हाेण्यास मदत हाेईल, असे मिसाळ यांनी सांगितले.