या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामांमध्ये धैर्याने व हुशारीने पुढे जाण्याची गरज असेल. अनेक बाबींमध्ये परिस्थिती तुमच्या धैर्याची परीक्षा घेऊ शकते. पण तुमची मेहनत तुम्हाला यश देईल. तुम्हाला कुटुंबासाेबत वेळ घालवण्याची संधी मिळेल व घरातील वातावरण सकारात्मक राहील.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअरक्षेत्रात हळू हळू प्रगतीचे संकेत मिळतील. व्यापाऱ्यांना नव्या संधी मिळू शकतात. काेणत्याही नव्या याेजनेवर काम सुरू करण्यापूर्वी व्यवस्थित विचार करणे आवश्यक आहे. नाेकरदार परिश्रमाने व वरिष्ठांच्या मदतीने आपल्या कामात सकारात्मक यश मिळवू शकतात.
नातीगाेती : या आठवड्यात काैटुंबिक जीवनात सामंजस्य राहील. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसाेबत वा प्रियजनांसाेबत भविष्याच्या याेजनांवर चर्चा करू शकता. प्रेमसंबंधात असणाऱ्यांना सकारात्मकता जाणवेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरातील वातावरण आनंदी राहील.
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या तब्बेतीबाबत जास्त काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुमचे आराेग्य सामान्य राहील, पण कामाच्या व्यापामुळे काहीसा थकवा जाणवू शकताे. नियमित व्यायाम व याेग आणि पुरेशी विश्रांती घेऊन तुम्ही स्वत:ला सुदृढ राखू शकता.
शुभदिनांक : 16, 20, 21
शुभरंग : हिरवा, पांढरा, गुलाबी
शुभवार : बुधवार, शुक्रवार
दक्षता : या आठवड्यात आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घेणे.
उपाय : या आठवड्यात शनिवारी शनिदेवाची आराधना करावी. ॐ शं शनैश्चराय नम: मंत्राचा 21 वेळा जप करावा. गरजूंना काळे तीळ वा काळे वस्त्र दान करावे.