कर्क या आठवड्यात तुमच्या मनात अनेक नव्या याेजना जन्म घेतील. तुम्ही तुमची कामे व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न कराल. काैटुंबिक जीवनात काही जबाबदाऱ्या वाढू शकता. पण तुम्ही त्या धैर्याने व हुशारीने पार पाडाल.घर-कुटुंबात एखादी शुभ वार्ता आल्यामुळे वातावरण प्रसन्न राहील.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांचे चीज हाेईल. व्यापाऱ्यांना जुन्या संपर्कांमधून फायदा हाेईल. एखाद्या नव्या प्राेजे्नटवर काम करण्याची संधीही मिळू शकते. नाेकरदारांना त्यांच्या कामात जबाबदारी वाढलेली दिसेल. वरिष्ठांसाेबत ताळमेळ राखणे फायद्याचे ठरेल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या काैटुंबिक जीवनात प्रेम व सहयाेग टिकून राहील. जीवनसाथीसाेबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात भावनिक जवळीक वाढेल. पण एखाद्या किरकाेळ गाेष्टीबाबत भावुकता अधिक असल्यामुळे तुम्ही संयम राखून बाेलायला व वागायला हवे.
आराेग्य : आराेग्याबाबत हा आठवडा सामान्य राहील. परंतु मानसिक तणाव व थकवा जाणवू शकताे. पुरेशी विश्रांती व संतुलित दिनचर्या अवलंबल्यास तुम्हाला स्वत:लाच खूप बरे वाटेल. तुम्हाला पाेटासंबंधित छाेट्या-माेठ्या समस्या जाणवू शकतात. त्या टाळण्यासाठी खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यावे.
शुभदिनांक : 17, 18, 19
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात रागावर नियंत्रण ठेवावे व वाद टाळावा.
उपाय : या आठवड्यात शिवलिंगावर अभिषेक करून ॐ नम: शिवाय मंत्राचा जप करावा.