सकाळच्या नाश्त्याचे महत्त्व

    19-Mar-2026
Total Views |
 

break 
 
हल्लीचे जीवन खूपच व्यस्त झालेले आहे. त्यामुळे दिवसभर काम करण्यासाठी शरीराला पुरेशी ऊर्जा आवश्यक असते. ही ऊर्जा मिळवण्यासाठी सकाळचा नाश्ता हा सर्वात याेग्य आहार मानला जाताे. खरं तर रात्रीच्या जेवणानंतर आपण बराच वेळ काहीच खात नसताे. त्यामुळे सकाळचा नाश्ता पाैष्टिक घटकांनी भरलेला असणे गरजेचे आहे. वैज्ञानिक दृष्टाेनातून पाहिल्यास रिकाम्या पाेटी शरीरात तयार हाेणाऱ्या पचनरसांमधून अंमल (ऍसिड ) तयार हाेऊ लागते. हे आम्ल आपल्या आतड्यांना हानी पाेहाेचवू शकते आणि शरीर कमकुवतही बनवते.सकाळचा नाश्ता न केल्यास शरीराला आवश्यक तेवढी ऊर्जा मिळत नाही.
 
सकाळचा नाश्ता टाळल्यास काही वेळाने पुन्हा भूक लागते आणि मग दिवसभर अस्वास्थ्यकारक अन्न (जंक फूड) खाल्ले जाते. असे अन्न भूक तर भागवते, पण आराेग्यासाठी हितकारक नसते.मानवी शरीराचे चयापचय (मेटॅबाॅलिझम) हे शरीराचे इंधन मानले जाते. त्यामुळे शरीर व्यवस्थित काम करू शकते. विविध कामे करण्यासाठी मेंदू आणि स्नायूंना या इंधनाची गरज असते. याेग्य आहार मिळाला नाही तर लाेक पाेट भरण्यासाठी जंक फूड खातात. त्यामुळे सकाळचा नाश्ता टाळल्यास चयापचय प्रक्रियेवर परिणाम हाेताे. जर सकाळचा नाश्ता प्रथिनयुक्त आणि कमी चरबीयुक्त असेल, तर दिवसभर जास्त खाण्याची इच्छा हाेत नाही. नाश्त्यासाेबत हंगामी फळे घेतल्यास त्याचा आराेग्यास अधिक फायदा हाेताे.