स्त्रियांबराेबरच पुरुषांमध्येही ब्यूटी प्राॅड्नटची क्रेझ

    19-Mar-2026
Total Views |
 
 


beauty
 
जगभरात साैंदर्य उद्याेग वेगाने वाढत आहे.स्किनकेअर, केसांची निगा, मेकअप, सुगंध यासारख्या साैंदर्य उत्पादनांवर जागतिक किरकाेळ खर्च 40 लाख काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचला आहे, असे मॅकिंजीच्या अहवालात नमूद केले आहे. हा गेल्या दाेन वर्षांत दरवर्षी 7% दराने वाढला आहे.एकूण किरकाेळ खर्चात हे प्रमाण खूपच जास्त आहे.पाैष्टिक आहारापेक्षा मेकअपला महत्त्व सध्या लाेक पाैष्टिक अन्न खाऊन सुंदर दिसण्यापेक्षा मेकअप करून चांगले दिसण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. याला ‘लिपस्टिक इफेक्ट’ म्हटले जात आहे. म्हणजेच कठीण काळात लाेक छाेट्या छाेट्या गाेष्टींवर खर्च करून स्वतःला चांगले दिसण्याचा प्रयत्न करतात.
 
पुरुषांचाही वाढला मेकअपमध्ये रस : साैंदर्य उद्याेग महिलांपुरता मर्यादित राहिला नाही.पुरुषांनाही स्किनकेअर, मेकअपमध्ये रस वाढला आहे. यावर ते भरपूर खर्च करतात. हेअर जेल, फेस क्रीम, टिंटेड माॅइश्चरायझर्स, कन्सीलर, आयब्राे जेल वापरतात. पुरुष ग्राहकांच्या साेयीसाठी किरकाेळ विक्रेते पुरुष सहायकांना नियुक्त करत आहेत. दक्षिण काेरियासारख्या देशांतील एन्फ्लुएन्सर्सनी या बदलाला गती दिली.
 
साैंदर्यावरील खर्चात माेठी वाढ : सेफाेराच्या प्राॅड्नट हेड प्रिया वेंकटेश यांनी सांगितले की, पुरुषांनी मेकअप करणे आता सामान्य झाले आहे. पुरुष व महिलांनी 2024 मध्ये साैंदर्य सेवांवर अंदाजे 14 लाख काेटी रुपये खर्च केले. बाेटाॅक्स, हायालूराेनिक फिलर्स, केमिकल पील्स, केस जाड करणारे लेसर यासारख्या सेवांचा समावेश आहे. इंटरनॅशनल साेसायटी ऑफ एस्थेटिक प्लॅस्टिक सर्जरीच्या मते, 2024 मध्ये 20 काेटी पेक्षा जास्त नाॅन-सर्जिकल ब्यूटी प्राेसीजर झाल्या. म्हणजे 2020च्या तुलनेत 40% वाढ झाली. या सेवा अशा उपकरणे, रसायनांनी केल्या जातात, ज्याला सामान्य लाेक खरेदी करू शकत नाहीत.
 
साेशल मीडियामुळे लहान मुलेही करू लागले मेकअप साेशल मीडियामुळे, मुले देखील साैंदर्य उत्पादनांकडे आकर्षित हाेत आहेत. अमेरिकेत, बेबी बूमर्समध्ये (1946 ते 1964 दरम्यान जन्मलेले) सामान्यतः 18 वर्षांच्या वयानंतर साैंदर्यप्रसाधने वापरण्यास सुरुवात झाली हाेती.परंतु आता, झेन अल्फा वयाच्या 8 व्या वर्षांपासूनच लिप ग्लाॅस, अँटी-एजिंग क्रीम सारख्या गाेष्टींची मागणी करतात. लहान मुलांनी मेकअप करण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे.त्यामुळे पालकांवरही वाढत्या खर्चाचा दबाव येत आहे, असे अल्टा ब्यूटीने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले.
 
हा बदल केवळ भावनिक कारणांमुळे झाला नाही. साेशल मीडियाचा दबाव, तंत्रज्ञान,मेडिकल ब्यूटी सर्व्हिसेसची वाढती मागणी यामुळे उद्याेगाला एक नवीन दिशा मिळाली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.कंपन्यांनी साेशल मीडियावर लक्ष केंद्रित केले साैंदर्य कंपन्यांनी मार्केटिंगवर जास्त खर्च न करता साेशल मीडियाद्वारे माेठा ग्राहक आधार निर्माण केला आहे. ब्रिटिश मेकअप ब्रँडच्या शार्लाेट टिलबरी यांनी सांगितले की, साेशल मीडियाने कंपन्यांना मदत केली आहे.त्वचेची काळजी घेणाऱ्या बबल सारख्या ब्रँडनी किशाेरवयीन मुलांमध्ये लाेकप्रियता मिळवली आहे. फ्रेगरेंस से्नटरमध्ये साेल डी जनेराे, कायाली सारख्या ब्रँडने त्यांच्या परफ्यूमना ‘मिस्ट’, ‘लेयरिंग’ अशी नावे देऊन माेठ्या संख्येने तरुणांना आकर्षित केले आहे.