मेष

    19-Mar-2026
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात तुमची ऊर्जा काैटुंबिक व प्राेफेशनल जीवनात संतुलन राखण्यात खर्च हाेऊ शकते. अनेक जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही व्यस्त राहाल, पण तुम्ही तुमच्या हुशारीने व व्यावहारिकतेने परिस्थिती सांभाळण्यात यशस्वी राहाल.कार्यक्षेत्रात स्वत:ची प्रतिष्ठा व प्रभाव मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसाल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात व्यवसायात संथ पण स्थिर प्रगती पाहायला मिळेल. कष्टासाेबत तुम्हाला भाग्याचीही साथ मिळेल. नियाेजनपूर्वक उचललेले पाऊल तुम्हाला उत्तम परिणाम देईल. व्यापारात जुन्या संपर्कातून फायदा हाेईल.प्रतिस्पर्धकांसमाेर तुमची स्थिती मजबूत हाेऊ शकते.
 
 नातीगाेती : प्रेम व संबंधाबाबत या आठवड्यात तुम्ही जास्त गंभीर दिसाल.प्रेमसंबंधात स्थिरता व भविष्याबाबत चर्चा हाेऊ शकते. काहीजण नाते पुढील स्तरावर नेण्याचा निर्णय घेऊ शकतात. जीवनसाथी वा प्रियजनांसाेबत बाेलताना संयम व समजुतदारपणा राखायला हवा.
 
 आराेग्य : आराेग्य सामान्य राहील आणि तुम्ही बहुतेक कामे जाेमात पूर्ण कराल. तरीही आठवड्याच्या अखेरीस थाेडा मानसिक असंताेष व थकवा जाणवू शकताे. वाहन चालवताना दक्षता बाळगा. दात, जीभ, घशाशी संबंधित छाेटा-माेठा त्रास संभवताे. त्यामुळे दिनचर्या व खाणे-पिणे सांभाळावे.
 
 शुभदिनांक : 17, 18, 19
 
 शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
 दक्षता : या आठवड्यात तुम्ही उत्पन्न व खर्चात संतुलन राखायला हवे.अनावश्यक खर्च टाळावेत.
 
 उपाय : राेज सूर्यदेवाला अर्घ्य देत ॐ घृणि सूर्याय नम: मंत्राचा 11 वा 21 वेळा जप करावा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा वाचून लाल फूल अर्पण करावे.