कुंभ

    19-Mar-2026
Total Views |

Horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी काही संघर्ष घेऊन येण्याची शक्यता आहे. पण तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल करून घ्याल. शारीरिक प्रफुल्लता व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. तुम्ही धार्मिक कामांकडे जास्त आकर्षित राहाल.
 
■ नोकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात नव्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो पण धीराने काम केले तर फायदा होई. जे जातक रियल इस्टेट, आर्किटेक्ट, फॅशन डिझायनिंग, सजावट आणि कलाजगतशी संबंधित कामांत असतील त्यांना घाईगडबडीमुळे तोटा सोसावा लागू शकतो.
 
■ नातीगोती या आठवड्यात कौटुंबिक जीवनात सामंजस्य राहील. प्रेमसंबंधात असणाऱ्यांना सकारात्मकता जाणवेल. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत वा प्रियजनांसोबत भविष्याच्या योजनांवर चर्चा करू शकता. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरातील वातावरण आनंदी राहील...
 
■ आरोग्य या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील पण कामाच्या व्यापामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम व संतुलित आहाराद्वारे तुम्ही स्वतःला सुदृढ ठेवू शकाल. तसेच प्राणायाम व ध्यानधारणा उपयोगी पडेल. पाय वा सांध्यात थोड्या वेदना जाणवू शकतात.
 
• शुभदिनांक : १६, २०, २१
 
■शुभवार-बुधवार, शुक्रवार
 
शुभरंगहिरवा, पांढरा, गुलाबी
 
दक्षता या आठवड्यात कोणत्याही कामात घाई करू नये. विचारपूर्वक निर्णय घेणे फायद्याचे ठरेल.
 
उपाय : या आठवड्यात शनिवारी शनिदेवाची आराधना करावी. ॐ शं शनैश्चराय नमः मंत्राचा २१ वेळा जप करावा. गरजूंना काळे तीळ दान करावे.