वय वाढते तसे मन कमजाेर हाेते का, असा प्रश्न काहींना पडताे. पण, असे नाही. अनुभवांनी समृद्ध झालेले मन, पहिल्यापेक्षा अधिक गंभीर आणि समजूतदार बनते, असे मत जर्मन लेखक एकहार्ट यांनी मांडले आहे. ‘द पावर ऑफ नाऊ’ या पुस्तकातून त्यांनी मनाची ताकद कशी असते, या बद्दल विचार व्यक्त केले आहेत.सक्रीय मनाची निर्णय घेण्याची क्षमता चांगली मन दाेन भागांमध्ये काम करते. एक भाग असताे, चेतन. हा भाग विचार करताे, भीती वाटते, तुलना करताे. तर दुसरा भाग असताे अचेतन. ताे बघताे, समजून घेताे आणि शांत राहताे. वय वाढू लागल्यावर मेंदुची गती हळू हाेऊ शकते. पण, मन सक्रीय ठेवले तर अनुभव, भावनात्मक समज आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक चांगली हाेते. त्यामुळे मनाला याेग्य दिशा देत रहा.जसे विचार कराल तसेच हाेऊ लागेल मनाचे सगळ्यात माेठे रहस्य आहे, तुम्ही जसा विचार कराल, शरीर आणि जीवन तसेच उत्तर देतील.
जर तुम्ही सतत आजारपण, एकटेपणा, कमकुवतपणा याबद्दल विचार करत राहिला तर मन त्याच दिशेने तुम्हांला ढकलेल. जरमनाला संकेत दिला की, मी अजून सक्षम आहे, तर मेंदू त्याचप्रमाणे शरीराला संदेश देते.याच कारणांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक कमी साधने उपलब्ध असूनही नेहमी सक्रीय, आनंदी दिसतात.नेहमी सकारात्मक विचार करा जर विचार सकारात्मक असतील तर वय कितीही झाले तरी, मन तुमची सगळ्यात माेठी ताकद बनते. तुम्हांला नेहमी आराेग्यदायी वाटेल.अशी जागवा मनाची ताकद वर्तमानात रहा भूतकाळातील चुका आणि भविष्यातील चिंता मनाची ऊर्जा कमी करतात. राेज 10 मिनट डाेळे बंद करून, श्वासावर लक्ष द्या. मन स्थिर राहील.मनाशी संवाद साधा दिवसातून एकदा तरी स्वतःशी बाेला. मनाला सांगा की, मी उपयाेगी आहे. माझ्या अनुभवाची किंमत आहे.त्यामुळे तुम्हांला नवी दिशा मिळेल.नेहमी शिकत राहा सतत मेंदुला नवीन गाेष्टी देत राहा. नवनवीन पुस्तके वाचा.नवीन आवडी जाेपासा. नवीन भाषा शिका. या सगळ्या गाेष्टी मनासाठी व्यायाम आहेत.