प्राणायाम केल्याने ऊर्जा नेहमी नियंत्रित हाेत असते

    17-Mar-2026
Total Views |
 
 

energyenergy 
भारतीय मानसशास्त्रात माणसाचे अस्तित्व पाच पातळींवर विभाजित आहे. अन्नमयकाेष(शरीर), प्राणमयकाेष (ऊर्जा), मनाेमयकाेष (मन), विज्ञानमयकाेष (बुद्धी) आणि आनंदमयकाेष (आनंद). याेगाभ्यासाने व शारीरिक श्रमाने शरीर सक्रिय राहते. प्राणायामाने ऊर्जा नियंत्रित हाेते, ध्यानाने मन शांत व प्रफुल्लित राहते, ज्ञानवर्धनाने बुद्धी मजबूत हाेते आणि निष्काम कर्म व अनुभवाने आनंदाची अनुभूती हाेते.