आध्यात्मिकतेत ईश्वरस्मरणास खूप महत्त्व आहे. भक्त परमात्मारुपी प्रितमचे ध्यान करीत करीत त्याच्यासाेबत एकरूप हाेताे. मनात समर्पणाचे भाव येताच भक्त ओळखताे की, आता मला तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. जाे आपल्या मनाला ईशचरणी जाेडू शकताे ताे लवकरच संपूर्ण रुपाने परमात्म्याशी एकाकार हाेताे. जेव्हा अविद्या व अज्ञान मनापासून दूर झाले तेव्हा आता बाहेर जाऊन एखाद्या गंगेत बुडी मारू? जी ज्ञानाची गंगा मनात वाहात आहे यातच सुस्नात हाेऊन पवित्र झालाे आहे.कबीर सांगतात, ‘कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर, पाछे लाग्याे हरि फिरे कहत कबीर कबीर।’ मनाची निर्मळता तेव्हा येते जेव्हा आपण संपूर्णत्वाने समर्पण करू शकताे. लक्षात ठेवा, समर्पण करताना ईश्वराला फक्त आपले पापच वाहिल्यामुळे काम हाेणार नाही.
समर्पण पूर्णरूपात तेव्हाच हाेते जेव्हा आपणआपले पुण्यही वाहताे. आपले पाप-पुण्य, गुण-दुर्गुण सारे काही वाहून भाररहित व्हावे. नंतर जे हाेईल ते हाेवाे.वेदाच्या ऋचा गातात की, प्रभू माझ्या मनाच्या मुळाशी आहे. ताे माझ्या अंत:करणाचा आधार अधिष्ठान आहे. परमचेतन, आनंदघन माझ्यातच विराजमान आहे.बुद्धी चकावून जाते की ताे शिवस्वरूप आनंदस्वरूप परमात्मा माझ्यातच आहे. तरी माझे मन त्रासते का? माझे मन दु:खी का आहे? माझे मन अशांत का आहे? मलला तर आनंदाने झुलत राहायला हवे. माझे गाणे कधीही बंद हाेऊ नये.
आपण असे राजे आहाेत जे भिकाऱ्याचे जीवन जगत आहाेत. आपण राेज उठून गाताे तर अवश्य की ‘त्वमेव माता च पिता त्वमेव’ काही नातीही माेजताे की, तूच माझी माता, तूच माझा पिता, माझा बंधू, माझा सखा. हे परमात्म्या, माझी सारी नाती तुझ्यासाेबतच आहेत. तरी मी फक्त एक किरकाेळसा जीव कसा असू शकताे.हे प्रभू तू आमचे सर्वस्व आहेस. मी तुझी अनंतकाेटी, ब्रह्मांडनायक कर्ता , नियंता ईश्वराची संतती आहे.समाज आणि कुटुंबात संतती आपल्या वडिलांच्या यशावर जर गर्व करते तर आपला परमपिता जाे आहे त्या परमात्म्याच्या यश व शक्तीपुढे तर काेणीही टिकत नाही.
ज्या माणसाला ही गाेष्ट कळते त्याच्या जीवनात एक अजब बेपर्वाई येते. यालाच ‘मलंग’ म्हणतात. मलंगाला काेणाचा राग नसताे. काेणाचा लाेभ नसताे. काेणाशी मैत्री नसते आणि काेणाशी वैरही नसते. जर पायी चालवावे लागले तर मलंग राजा हाेऊन चालताे. तसेच जर काेणी त्याला उत्तम कारमध्ये बसवले तर त्यातही ताे दिमाखात बसताे.खरे हे आहे की जेव्हा आपण जगासाेबत उठत- बसत असताे. मजामस्ती करताे तेवहा आपल्याला आनंद हाेताे. जर जगात आनंद आहे तर परमात्मा परमानंदरूप आहे. जेव्हा काेणी त्याच्या प्रेमात रंगताे तेव्हा जीवन मलंग हाेते. जीवन जेव्हा मलंग हाेते तेव्हा प्रत्येक स्थितीत, प्रत्येक रुपात, प्रत्येक स्वरुपात, आनंदात, दु:खात, मानात, अपमानात, प्रत्येक गाेष्टीत त्याचाच रंग पाहताे.