शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले. शासकीय रुग्णालयांत उपचारांसाठी माेठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. या रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी रुग्णालयात पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवला जात आहे. शासकीय महाविद्यालयांत औषध खरेदीची ठराविक प्रक्रिया आहे. औषध खरेदीसाठी मिळणाऱ्या निधीपैकी सुमारे 70 ट्नके खरेदी वस्तू प्राधिकरणामार्फत, तर उर्वरित 30 ट्नके र्नकम संबंधित संस्थांकडून खर्च केली जाते.याशिवाय जिल्हा नियाेजन समितीतून प्राप्त हाेणाऱ्या निधीतूनही आवश्यक औषधांची खरेदी करण्यात येते; तसेच शासकीय रुग्णालयांत पीपीपी तत्त्वावर नवीन यंत्रणा उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.