आणि जेव्हा आपणास असे आढळेल की आता यापुढे काम- चिंतन करता येत नाही, तेव्हाच ध्यानात प्रवेश करा. मग कदाचित् पंधरा मिनिटे, अर्धा तास आपल्या चित्तात काही कामविचार असणार नाही. कारण अर्जुन काही ब्रह्मचारी नाहीये. ताे पुरा ब्रह्मचारी असता तर मग असा काही प्रश्नच उद्भवला नसता. मग ब्रह्मचर्याची आठवण द्यायचीही गरज राहिली नसती.एक गमतीची गाेष्ट आपणास सांगताे. महावीरांआधीच्या तेवीस तीर्थकरांनी ब्रह्मचर्याची गाेष्ट कधीच केली नाही. या तेवीस तीर्थकरांनी जैनांना ब्रह्मचर्याविषयी चुकूनही सांगितलं नाही. ते फ्नत चार धर्मांची गाेष्ट कंरीत असत- अहिंसा, सत्य, अपरिग्रह व अचाैर्य. म्हणून पार्श्वनाथांपर्यंतच्या धर्माचं नाव चातुर्याम धर्म असं आहे. महावीरांना त्यात ब्रह्मचर्य जाेडावं लागलं, पंच महाव्रतं बनवावी लागली.
एक व्रत आणखी सांगावं लागलं. इतिहासाचे जे संशाेधक आहेत, त्यांना खूप आश्चर्य वाटत की ‘महावीरांनाच ब्रह्मचर्य जाेडावं असं का वाटलं? बाकी तेवीस तीर्थकरांनी ते का नाही सांगितलं?’ हे तेवीस जण ज्या लाेकांना सांगत हाेते ते निष्णात ब्रह्मचारी हाेते. हे उपदेश ज्यांना मिळाले त्यांना ब्रह्मचर्य सहज हाेतं. ती लाेकचर्चा नव्हती.सर्वसाधारण माणसं ब्रह्मचारी नसतात आणि त्यांच्यासाठी ही गाेष्ट केलेली नव्हती. तीर्थंकरांचे गूढ संदेश सारे गुप्त हाेते. ती सर्व गूढं गुप्त राखण्यात आली हाेती. ती फ्नत साधकांनाच सांगितली जात असत. ही सगळी महावीरांनी आमजनतेसाठी खुली केली. अन् यामुळे दुसरी घटना झाली की पूर्वीचे सारे तेवीस तीर्थकर त्यांच्यापुढे फिके पडून गेले.