हा आठवडा तुमच्यासाठी हुशारी, व्यवस्थित विचार व स्वयंशिस्तीचा आहे. तुम्ही तुमची कामे अधिक व्यवस्थितपणे करण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. पूर्वीची अर्धवट कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. धैर्य व संयमाने पुढे गेल्यास स्थिती उत्तम राहील.
■ नोकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये तुमचे श्रम प्रशंसिले जातील. एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. सहकर्मचाऱ्यांसोबत सहायक व्यवहारा राखावेत. जर नव्या नोकरीच्या शोधात असाल तर सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यापाऱ्यांनी कागदोपत्री कामांमध्ये विशेष दक्षता बाळगावी.
■ नातीगोती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये सामंजस्य राहील. घरातील एखाद्या सदस्याच्या हजेरीमुळे आनंद मिळू शकतो. जीवनसाथीसोबत मधुर संबंध राहतील पण जाछा टिकात्मक धोरण अवलंबणे टाळावे. प्रेमसंबंधात विश्वास व स्पष्टपणा असावा. एखादा जुना मित्र भेटू शकतो.
■ आरोग्य : आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. पोट, त्वचा वा अॅलर्जीसंबंधत समस्या होण्याची शक्यता आहे. नियमित व्यायाम व संतुलित आहाराला प्राधान्य द्यावे. जादा विचार करण्यामुळे मानसिक थकवा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ध्यान आणि योग दिनचर्येत सामील करावा.
■ शुभदिनांक : ०२, ०६, ०७
शुभरंग : आकाशी, निळा, काळा
■ शुभवार बुधवार, शुक्रवार, शनिवार
■ दक्षता : या आठवड्यात कोणत्याही कामात टिका व पूर्णतावाद टाळावा. आर्थिक बाबतीत जोखीम घेऊ नये.
■ उपाय: बुधवारी श्रीगणेशाला दुर्वा वाहाव्यात आणि ॐ गण गणपतये नमः मंत्राचा १०८ वेळा जप करावा. गरजूंना हिरवी भाजी वा हिरवे वस्त्र दान करावे.