वृषभ

    01-Mar-2026
Total Views |

Horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी स्थैर्यासोबत प्रगतीचे संकेत देत आहे. मागील काळातील मेहनत आता हळू हळू परिणाम दाखवू लागेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या दिशेने अधिक स्पष्टपणे पुढे जाल. या काळात व्यावहारिक विचार व धैर्य तुमची सर्वांत मोठी ताकद असेल.
 
■ नोकरी-व्यवसाय : कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. वरिष्ठ तुमच्या कामामुळे संतुष्ट राहतील. तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपवतील. नोकरी बदलण्यापूर्वी पूर्ण माहिती मिळवावी. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा ग्राहकांचा विश्वास मजबूत करण्याचा आहे. गुंतवणूक विचारपूर्वक करावी.
 
■ नातीगोती या आठवड्यात नात्यांमध्ये सामंजस्य राहील व जोडीदाराशी उत्तम संवाद राहील व त्यामुळे दांपत्य संबंध उत्तम राखू शकाल. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल आहे. प्रेमसंबधात भावनिक जवळीक वाढेल. परंतु हट्ट करणे टाळावे. मित्र भेटल्यामुळे मन प्रसन्न राहील.
 
■ आरोग्य : आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य राहील. तशी तुम्ही शारीरिक व्यायामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. याआठवड्यात तुम्हाला सर्दी व पचनाबाबतच्या समस्या सतावण्याची शक्यता आहे. पुरेशी झोप व मानसिक शांतीसाठी ध्यानाचा आधार घेतल्यास तुमचे आरोग्य उत्तम बनवील.
 
■ शुभदिनांक : ०२, ०६, ०७
 
शुभरंग : आकाशी, निळा, काळा
 
■ शुभवार बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
■ दक्षता : या आठवड्यात उसने पैसे देण्यापूर्वी विचार करावा % कागदपत्रावर सही करण्यापूर्वी अटी वाचव्यात.
 
उपाय : शुक्रवारी लक्ष्मीदेवीची पूजा करावी व पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.